अवघ्या ₹76 च्या IPO वर गुंतवणूकदार तुटून पडले; अजूनही आहे संधी! जाणून घ्या डिटेल्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2024 04:49 PM2024-08-04T16:49:37+5:302024-08-04T16:54:26+5:30

Ola Electric मध्ये गुंतवणूक करण्यासाठी अजून वेळ गेलेली नाही.

Ola Electric IPO : देशातील आघाडीची इलेक्ट्रिक स्कूटर (E-Scooter) कंपनी Ola Electric चा IPO उघडला आहे. हा IPO 2 ऑगस्ट रोजीच सबस्क्रिप्शनसाठी उघडण्यात आला होता, मात्र यात गुंतवणूक करण्याची वेळ अजून संपलेली नाही.

तुम्हाला या IPO वर पैज लावायची असेल, तर तुम्ही 6 ऑगस्ट 2024 पर्यंत यात गुंतवणूक करू शकता. या IPO ची किंमत 72 ते 76 रुपये आहे.

गुंतवणूकदार ओला इलेक्ट्रिकच्या आयपीओची बऱ्याच काळापासून प्रतीक्षा करत होते. कंपनीने 195 शेअर्सचा लॉट निश्चित केला आहे. म्हणजेच, तुम्हाला कमीत कमी 14,820 रुपयांचे 195 शेअर्स घ्यावे लागतील.

Ola Electric IPO ला गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत 38 टक्के सबस्क्रिप्शन मिळाले आहे. बहुतांश किरकोळ गुंतवणूकदारांनी 1.70 पट सबस्क्रिप्शन घेतले आहे. तर, गैर-संस्थांनी 0.22 टक्के सबस्क्रिप्शन घेतले आहे. याशिवाय, ओला कर्मचाऱ्यांच्या श्रेणीमध्ये हा IPO 5.42 पट सबस्क्राईब झाला आहे.

ओला इलेक्ट्रिक आयपीओद्वारे बाजारातून 6,145.56 कोटी रुपये उभारणार आहे. या अंतर्गत एकूण 808,626,207 शेअर्स विक्री केले जातील. आपण ताज्या इश्यूबद्दल बोललो तर, 10 चे दर्शनी मूल्य असलेले 723,684,210 नवीन शेअर्स जारी केले जातील.

या शेअर्सची एकूण किंमत 5,500 कोटी रुपये असेल. दुसरीकडे, ऑफर फॉर सेल (OFS) द्वारे 645.56 कोटी रुपयांच्या 84,941,997 शेअर्ससाठी बोली मागवण्यात येणार आहे.

2 ते 6 ऑगस्ट दरम्यान बोली प्राप्त झाल्यानंतर कंपनीच्या शेअर्सचे वाटप 7 ऑगस्ट रोजी होऊ शकते. बोली लावणाऱ्या गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यांमध्ये शेअर क्रेडिट 8 ऑगस्ट रोजी होतील. कंपनीने बीएसई आणि एनएसई या दोन्ही स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट करण्यासाठी 9 ऑगस्ट ही संभाव्य तारीख निश्चित केली आहे.