Old Vs New Tax Regime Switch: महत्वाचा खुलासा! नव्या-जुन्या करप्रणालीत कितीवेळा स्विच करता येणार; जाणून घ्या नियम... By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2023 05:10 PM 2023-02-03T17:10:30+5:30 2023-02-03T17:14:46+5:30
Income Tax: दोन सिस्टिम आणि दोन वेगवेगळे नियम असल्याने आता जर नव्या सिस्टिमवर स्विच झालो तर पुन्हा जुनी सिस्टिम निवडता येईल का? आली तर असे कितीवेळा नवे-जुने करता येईल, असा सवाल उपस्थित होत होता. करदात्यांना महागाईच्या काळात मोदी सरकारने मोठा दिलासा दिला होता. सात लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या लोकांना कराच्या कक्षेतून बाहेर ठेवण्यात आले आहे. परंतू, हा फायदा नवीन कर प्रणाली निवडणाऱ्यांनाच होणार आहे. जुन्या करप्रणालीवर विविध योजनांद्वारे पैसे वाचविता येतात, त्यांना याचा फायदा दिला जाणार नाहीय. परंतू, या दोन्ही प्रणालींमध्ये तुम्हाला स्विच होता येणार आहे.
समजा आता तुमचे उत्पन्न ७ लाखांच्या आसपास आहे. तर तुम्ही यंदा करमुक्त होण्यासाठी जर नवीन कर प्रणाली निवडली तर तुम्हाला पुढच्या वर्षी उत्पन्न वाढले तर जुन्या करप्रणालीत जाता येईल का? असा प्रश्न डोकावत असेल तर त्याचे उत्तरही आले आहे.
देशात १ एप्रिल २०२० पासून नवीन टॅक्स सिस्टिम लागू करण्यात आली आहे. परंतू, या सिस्टिममध्ये विमा, शिकवणी फी, गुंतवणुकीद्वारे कर वाचविता येणार नाहीय. यामुळ बहुतांश लोकांनी आधीपासून गुंतवणूक केलेली असल्याने जुनी सिस्टिमच निवडलेली आहे. नव्या सिस्टिममध्ये गेल्यास गुंतवणूकही करायची आणि करही भरायचा असा पेच आहे.
नवीन करप्रणाली ही उच्च उत्पन्न असलेल्या लोकांसाठी फायद्याची आहे. परंतू, कमी उत्पन्न गटाच्या लोकांना ती गैरसोयीची आहे. दोन सिस्टिम आणि दोन वेगवेगळे नियम असल्याने आता जर नव्या सिस्टिमवर स्विच झालो तर पुन्हा जुनी सिस्टिम निवडता येईल का? आली तर असे कितीवेळा नवे-जुने करता येईल, असा सवाल उपस्थित होत होता.
करदाते जुन्या कर स्लॅबमधून नवीन स्लॅबमध्ये जाऊ शकतात तसेच ते नवीन स्लॅबमधून जुन्या स्लॅबमध्ये परत येऊ शकतात. परंतू ही सूट साऱ्या करदात्यांना नाहीय. केवळ नोकरदार करदातेच प्रत्येक आर्थिक वर्षात कर स्लॅब बदलू शकतात. त्यातही पगार, भाडे किंवा इतर स्त्रोतांमधून उत्पन्न आहे ते प्रत्येक वेळी कर स्लॅब बदलू शकतात.
व्यवसायातून उत्पन्न मिळवणाऱ्या करदात्यांना नवीन किंवा जुनी व्यवस्था निवडण्याची एकच संधी असेल. दुकानदार, व्यावसायिक लोक एकदाच स्लॅब बदलू शकणार आहेत.