onion price increase reached double in 45 days check when price will drop
कांद्याच्या महागाईमुळे जनता त्रस्त! गेल्या दीड महिन्यात किंमती दुप्पट, कधी स्वस्त होणार? By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2021 01:19 PM2021-02-22T13:19:25+5:302021-02-22T15:17:20+5:30Join usJoin usNext onion price : नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींनंतर आता कांद्याचे दर गगनाला भिडले आहेत. देशाची राजधानी दिल्ली आणि आसपासच्या घाऊक बाजारात कांद्याची किंमत (Onion Price) 50 रुपयांच्या जवळपास सुरू आहे. याचबरोबर, कांद्याची किरकोळ किंमत 65 ते 75 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचली आहे. दरम्यान, गेल्या दीड महिन्यात कांद्याचे दर दुप्पट झाले आहेत. तसेच, लासलगावच्या सर्वात मोठ्या बाजारपेठेत कांद्याची किंमत प्रति क्विंटलला 1000 रुपये महाग झाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, गेल्या दोन दिवसांत लासलगाव बाजारात कांद्याची सरासरी घाऊक किंमत प्रति क्विंटल 970 रुपयांनी वाढून 4200-4500 रुपये प्रतिक्विंटल झाली आहे. शनिवारी लासलगावमध्ये कांद्याची सरासरी किंमत 4250-4,551 रुपये प्रति क्विंटल होती. त्याचबरोबर 20 फेब्रुवारी रोजी लासलगाव बाजारात कांदा प्रति क्विंटल 3500 ते 4500 रुपये या दराने विकला जात होता. आयएएनएसच्या वृत्तानुसार, सध्या कांद्याच्या महागाईपासून मुक्त होण्याची कोणतीही आशा नाही. किमान आणखी 15 दिवस कांद्याचे दर कमी होण्याची शक्यता नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे, कारण मार्चमध्येच रब्बी पीक बाजारात येईल. शनिवारी दिल्लीच्या आझादपूर बाजारात कांद्याचे घाऊक दर 12.50 रुपयांपासून ते 45 रुपये प्रतिकिलोपर्यंत होते, तर मॉडेलचा दर 31.25 रुपये प्रतिकिलो होता. दिल्लीच्या आझादपूर बाजारातील बटाटा-कांदा व्यापारी असोसिएशनचे (POMA) सरचिटणीस राजेंद्र शर्मा यांचे म्हणणे आहे की, येत्या महिन्यापासून कांद्याची आवक पर्याप्त होईल आणि त्यावेळी काद्यांच्या भावात घट होईल, अशी अपेक्षा आहे. पुरवठा कमी झाल्यामुळे कांद्याची किंमत वाढल्याचे आशियातील सर्वात मोठे फळ-भाजीपाला बाजार आझादपूर बाजार समितीचे अध्यक्ष आदिल अहमद खान यांनी सांगितले. याशिवाय, पावसामुळे कांद्याच्या आवकांवर परिणाम झाला आहे, त्यामुळे किंमती वाढल्या आहेत. आदिल अहमद खान यांच्या म्हणण्यानुसार, पुढच्या महिन्यापासून कांद्याची आवक पर्याप्त होईल. त्यानंतर काद्यांच्या दरात कपात होण्याची शक्यता आहे.टॅग्स :कांदाव्यवसायonionbusiness