SBI च्या या स्कीममध्ये करा केवळ १००० रुपयांची गुंतवणूक; TAX सूट आणि मिळणार अनेक फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 02:26 PM2022-03-03T14:26:16+5:302022-03-03T14:32:28+5:30

SBI Tax Savings Scheme: अनेकदा आपण आपल्या कमाईवर आकारला जाणारा टॅक्स कसा वाचवता येईल याचा विचार करतो. पण ही स्कीम तुमच्यासाठी फायद्याची ठरणार आहे.

SBI Tax Savings Scheme: अनेकदा आपण आपल्या कमाईवर आकारला जाणारा टॅक्स कसा वाचवता येईल याचा विचार करतो. यासाठी आपण पर्यायांच्या शोधातही असतो. दरम्यान, टॅक्स वाचवण्यासाठी अनेक टॅक्स सेव्हिंग इन्स्ट्रूमेंट्स (Tax savings instruments) उपलब्ध आहेत.

टॅक्स वाचवण्यासाठी, तुम्हाला टॅक्स सेव्हिंग स्कीम निवडावी लागेल. याच्या मदतीनं तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरताना त्याचा फायदा घेऊ शकता.

SBI टॅक्स सेव्हिंग स्कीम, २००६ हा असाच एक गुंतवणूकीचा पर्याय आहे. एसबीआयनं आपल्या ट्विटर अकाऊंटद्वारे यासंदर्भात माहिती दिली आहे. एसबीआय टॅक्स सेव्हिंग स्कीमसोबत तुमची बचत वाढवा असं बँकेनं म्हटलंय.

एसबीआय टॅक्स सेव्हिंग स्कीम २००६ एफडी योजनेत किमान १ हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. तसंच एका वर्षात १५०००० हजार रुपयांपेक्षा रक्कम अधिक असू नये.

एसबीआय टॅक्स सेव्हिंग स्कीम २००६ मध्ये उघडण्यात येणाऱ्या खात्यासाठी किमान कालावधी पाच वर्षांचा आहे. तसंच तो जास्तीतजास्त १० वर्षांपर्यंत वाढवला जाऊ शकतो.

SBI टॅक्स सेव्हिंग स्कीम, २००६ चा व्याज दर फिक्स्ड डिपॉझिटप्रमाणेच आहे. अलीकडेच SBI ने टर्म डिपॉझिटवरील व्याजदरात वाढ केली आहे. ५ वर्षे ते १० वर्षांपर्यंतची मॅच्युरिटी सामान्य ग्राहकांना ५.५ टक्क व्याज देईल. हे दर १५ फेब्रुवारी २०२२ पासून लागू आहेत.

एसबीआय टॅक्स सेव्हिंग स्कीम खाते ते सुरूवात केलेल्या तारखेपासून पाच वर्षांच्या समाप्तीपूर्वी काढले जाऊ शकत नाही. योजनेसोबत नॉमिनीची सुविधा देखील उपलब्ध आहे.

आयकर कायदा, १९६१ च्या कलम ८० सी अंतर्गत यात कर सूट मिळू शकते. टीडीएस प्रचलित दराने लागू होतो. आयकर नियमांनुसार कर कपातीतून सूट मिळण्यासाठी ठेवीदाराकडून फॉर्म 15 /15॥ जमा केला जाऊ शकतो.