Financial Work: उरलाय केवळ एक आठवडा, लवकरच आटोपून घ्या ही कामं, अन्यथा होईल मोठं नुकसान By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 04:46 PM 2023-03-22T16:46:25+5:30 2023-03-22T16:50:22+5:30
Pending Financial Work: ३१ मार्च अवघ्या आठवड्यावर आला आहे. तसेच नवं आर्थिक वर्ष १ एप्रिलपासून सुरू होणार आहे. मात्र अनेक अशी कामं आहेत जी ३१ मार्चच्या आधी पूर्ण होणं आवश्यक आहे. अन्यथा पुढे त्यामुळे नुकसान होऊ शकतं. ही कामं पुढीलप्रमाणे आहेत. ३१ मार्च अवघ्या आठवड्यावर आला आहे. तसेच नवं आर्थिक वर्ष १ एप्रिलपासून सुरू होणार आहे. मात्र अनेक अशी कामं आहेत जी ३१ मार्चच्या आधी पूर्ण होणं आवश्यक आहे. अन्यथा पुढे त्यामुळे नुकसान होऊ शकतं. ही कामं पुढीलप्रमाणे आहेत.
आधार-पॅनकार्ड लिंक पॅन कार्डला आधारकार्डसोबत लिंक करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२३ आहे. आधी हे काम ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत करणे आवश्यक होते. मात्र त्यानंतर ही तारीख वारंवार वाढवण्यात आली होती. आता ३१ मार्चपर्यंत पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक केलं नाही तर तुमचा पॅनकार्ड डिअॅक्टिव्हेट होईल. त्याशिवाय तुमच्यावर दंडात्मक कारवाईही होऊ शकते.
आयटीआर जर तुम्हाला अपडेटेड आयटीआर फाईल करायचा असेल तर त्यासाठीही तुमच्याकडे ३१ मार्चपर्यंतचाच कालावधी आहे. FY20साठी अपडेटेड आयटीआर फाईल करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च आहे. आयटीआर फाईल झाली नसल्याच्या स्थितीत तुम्ही तेही फाईल करू शकता.
डिमॅट अकाऊंट शेअर बाजारामध्ये ड्रेडिंग करणाऱ्यांसाठी ३१ मार्चपर्यंत डीमॅट अकाऊंटमध्ये नॉमिनीचं नाव जोडणं आवश्यक आहे. जर येणाऱ्या तारखेपर्यंत असं केलं नाही, तर तुमचं डिमॅट अकाउंट फ्रिज होईल. त्यानंतर तुम्ही स्टॉक खरेदी किंवा विक्री करू शकणार नाही. सेबीकडून ते अनिवार्य करण्यात आले आहे.
पीएम वय वंदना योजना एलआयसीच्या पीएम वय वंदना योजनेमध्ये गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२३ आहे. त्यानंतर या योजनेमध्ये गुंतवणूक करता येणार नाही. सरकारकडून या योजनेच्या शेवटच्या तारखेबाबत कुठलीही अधिसूचना जारी करण्यात आलेली नाही.
एलआयसी पॉलिसी जर तुम्हाला हाय प्रीमियमवाल्या एलआयसी पॉलिसीवर टॅक्स डिडक्शनचा फायदा घ्यायचा असेल तर ३१ मार्च २०२३ पूर्वी तिला सब्स्क्राइब करावं लागेल. ३१ मार्चनंतर त्यावर सवलत मिळणार नाही.