5 लाखातून उभे केले 7000 कोटींचे साम्राज्य! Phanindra Sama चे स्टार्टअप काय? By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2024 02:16 PM 2024-10-09T14:16:33+5:30 2024-10-09T14:23:40+5:30
Panindra Sama Redbus Success Story: फणींद्र सामा एका यशस्वी स्टार्टअपचे प्रमुख. हे स्टार्टअप तुम्हाला चांगलं माहिती असेल, पण तुम्ही कधी या व्यक्तीबद्दल ऐकलं नसेल. आणखी एक गोष्ट म्हणजे फणींद्र सामा यांनी हा उद्योग उभा केला तो ५ लाख रुपयातून. जाणून घ्या फणींद्र सामा यांची यशोगाथा! विचारपूर्वक निर्णय घेतला आणि त्याला सातत्य, संयम आणि कष्टाची जोड दिली तर यश मिळतेच! फणींद्र सामा यांनीही अशाच पद्धतीने काम केले आणि पाच लाख रुपये गुंतवून ७००० कोटींचे बिझनेस उभा केला. सामा यांचे स्टार्टअप आज देशभरात प्रसिद्ध आहे.
तुम्ही म्हणाल फणींद्र सामा यांनी असा कोणते स्टार्टअप सुरू केलं. तर ऑनलाइन तिकीट बुकींग प्लॅटफॉर्म 'रेडबस'बद्दल तुम्ही ऐकलं असेल. हे फणींद्र सामा यांनी दोन मित्रांच्या मदतीने सुरू केलेलं आहे.
फणींद्र सामा हे आधी नोकरी करायचे. पण, स्वतःचा व्यवसाय/बिझनेस करण्याचा विचार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. त्यात जवळ पुरेसे पैसे नव्हते. पण, मित्रांच्या साथीने एक मोठा उद्योग उभा केला.
ज्यावेळी फणींद्र सामा यांनी रेडबस स्टार्टअप सुरू केलं, तेव्हा त्यांच्या बँक खात्यात ५ लाख रुपये होते. आज त्यांच्या कंपनीची नेटवर्थ ६९८५ कोटी रुपये आहे. कॉलेजमध्ये भेटलेल्या सुधाकर पसुपुनुरी आणि चरण पद्माराजू या मित्रांच्यासोबतीने त्यांनी बिझनेस आयडिया प्रत्यक्षात उतरवली आणि यशस्वी करून दाखवली.
फणींद्र सामा, सुधारकर पसुपुनुरी आणि चरण पद्माराजू हे तिघेही वेगळ्या कंपन्यामध्ये नोकरी करत होते. त्या काळात फणींद्र सामांनी बिझनेस सुरू करण्याबद्दल चर्चा केली. २००६ मध्ये तिघे एकत्र आले आणि रेडबस स्टार्टअप सुरू झाले.
रेडबस सारखी आनलाईन तिकीट बुकिंग सिस्टीम सुरू करण्याची कल्पना सुचली त्याचे कारणही भारी आहे. फणींद्र सामा यांना शहरातून गावी जायचं होतं पण, तिकीट बुक करताना त्यांना खूप धडपड करावी लागली.
फणींद्र सामा यांना खूप प्रयत्नानंतर तिकीट मिळाले. त्याचवेळी फणींद्र सामा यांना आनलाईन तिकीट बुकिंग सिस्टीम सुरू करण्याची आयडिया सुचली. आज असंख्य लोक आनलाईन तिकीट बुक करण्यासाठी रेडबस अॅपचा वापर करतात.