Ratan Tata Story: ‘देशभक्त’ रतन टाटांमुळे वाचलं स्टार्टअप; बड्या उद्योजकाने सांगितला हृदयस्पर्शी किस्सा By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 12:04 PM 2022-06-17T12:04:57+5:30 2022-06-17T12:09:23+5:30
Ratan Tata Story: रतन टाटांनी अनेक रसातळाला गेलेल्या कंपन्यांना नवसंजीवनी दिली असून, विविध स्टार्टअप्सना कायम प्रोत्साहन दिले आहे. त्यापैकी एका उद्योजकाने सांगितलेली ही सत्यकथा... रतन टाटा हे जगभरातील दिग्गज उद्योजकांपैकी एक आहेत. TATA ग्रुपमध्ये शेकडो कंपन्या असून, टाटाचा विस्तार जगातील अनेक देशांमध्ये आहे. केवळ भारतीय बाजारपेठेत नाही, तर शेअर मार्केटमध्येही टाटा ग्रुपचा दबदबा कायम असल्याचे दिसत आहे.
Ratan Tata यांनी अनेक कंपन्यांना तारल्याचे सांगितले जाते. रसातळाला जात असलेल्या विविध क्षेत्रातील कंपन्यांचे पुनरुज्जीवन टाटा यांनी केल्याच्या अनेक कथा सांगितल्या जातात. यातच आता क्रिस कॅपिटलचे संजीव कौल यांनी म्हटले आहे की, भारतातील दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांच्यासोबत झालेल्या त्यांच्या एका भेटीमुळे स्टार्टअप सुरू करण्यात मदत झाली.
सन २००४ मध्ये जेट एअरवेजच्या फ्लाइटमध्ये घडलेला किस्सा संजीव कौल यांनी एका लिंक्डइन पोस्टमध्ये हे लिहिला आहे. ही गोष्ट आहे Advinus Therapeutics. या कंपनीचा प्रवर्तक टाटा समूह आहे. मात्र, या स्टार्टअपला टाटांकडून निधी मिळत असल्याची कथा एखाद्या चित्रपटातील दृश्यापेक्षा कमी वाटत नाही, असे कौल यांनी म्हटले आहे.
संजीव कौल लिहितात की, सन २००४ मध्ये ते जेट एअरवेजच्या विमानातून मुंबईहून दिल्लीला येत होते. मुंबई एका नाविन्यपूर्ण स्टार्टअपला निधी देण्याच्या संदर्भात ते एका मोठ्या उद्योगपतीला भेटायला आले होते आणि त्यांची बैठक अजिबात चांगली झाली नाही.
कौल सांगतात की, मी विमानात आपल्या सीट 2F वर बसलो होतो आणि प्रोजेक्ट प्रेझेंटेशनमध्ये कुठे चूक झाली हे पाहण्यासाठी PPT तपासत होतो. तेव्हाच विमानात रतन टाटा आले आणि अचानक एकदम शांतता पसरली. रतन टाटा त्यांच्या शेजारी 2D सीटवर येऊन बसले.
रतन टाटा आपल्या शेजारी येऊन बसले हे पाहिल्यावर मी एकदम स्तब्ध झालो. मात्र, काही क्षणांनी पुन्हा ते आपल्या PPT प्रेझेंटेशनकडे वळले. कौल पुढे लिहितात की, विमानाने उड्डाण केल्यानंतर चुकून त्यांच्या टायवर ज्युस सांडला आणि हे पाहून रतन टाटा यांनी लगेचच एक रुमाल त्याच्यासमोर धरत ज्युस साफ करण्यास मदत केली.
यानंतर कौलच्या डोळ्यात पाणी आल्याचे टाटांनी पाहिले. त्यांनी संजीव कौल यांना याचे कारण विचारले. कौल यांनी सांगितले की, त्यांना २ शास्त्रज्ञांसोबत एक स्टार्टअप सुरू करायचा होता आणि त्यासाठीच्या निधीच्या संदर्भात ते मुंबईत आले होते.
पण त्यांनी आता सर्व पर्याय आजमावले. परंतु, त्यांना अजून निधी मिळू शकलेला नाही. कौल यांनी टाटा यांना सांगितले की, ते दोन्ही शास्त्रज्ञ आता अमेरिकेत परतण्याची तयारी करत आहेत. यावर टाटांनी त्यांचा नंबर मागितला आणि म्हणाले की, लवकरच त्यांना टाटा समूहातून संपर्क साधला जाईल.
त्याच रात्री कौल यांच्याशी टाटांनी संपर्क साधला आणि दोन शास्त्रज्ञांच्या भेटीसाठी त्यांना मुंबईला बोलावले. कौल लिहितात की, ते मुंबईला गेले, प्रेझेंटेशन दिले आणि त्यानंतर सर्व काही इतिहास आहे.
रतन टाटा यांचे देशभक्त असल्याचे वर्णन करताना कौल म्हणाले की, हे सर्व शक्य झाले कारण एका व्यक्तीला हे लक्षात आले की, भारतात २ वैज्ञानिकांना संधी मिळायला हवी.
देशभक्त रतन टाटा यांनी ब्रेन ड्रेन थांबवण्यास मदत केली. त्यांनी सांगितले की, Advinus ने गेल्या दशकात जगभरातील ५० शास्त्रज्ञांना भारतात काम करण्याची संधी दिली आहे.
TATA ग्रुप देशातील सर्वांत यशस्वी उद्योगांपैकी एक असून, ऑटोमोबाइल, विमान, इन्सुरन्स, स्टील, केमिकल अशा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये TATA ग्रुपने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. सर्वाधिक विश्वासू ब्रँड म्हणूनही टाटाकडे पाहिले जाते.