pay using irctc imudra visa rupay card on your favourite apps and get upto rs 2000 cashback
IRCTC कडून 28 फेब्रुवारीपर्यंत 2000 रुपयांची कॅशबॅक ऑफर, यासाठी फक्त इतकेच करावे लागेल काम... By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2021 08:32 PM2021-02-03T20:32:24+5:302021-02-03T20:55:12+5:30Join usJoin usNext नवी दिल्ली : Indian Railways : ऑनलाइन रेल्वे तिकिट बुकिंगची सुविधा देणाऱ्या भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनकडून (IRCTC) ग्राहकांसाठी आय-मुद्रा (iMudra) अॅपची सुविधा देण्यात येत आहे. या अॅपमध्ये ग्राहकांना डिजिटल कार्ड मिळते, जे पेमेंट आणि ऑनलाइन शॉपिंगसाठी वापरले जाते. आयआरसीटीसी सध्या ग्राहकांना IRCTC iMudra VISA / RuPay कार्डवर 2000 रुपयांपर्यंतची कॅशबॅक ऑफर करीत आहे. आयआरसीटीसीने ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे. 'ग्राहकांनी आपल्या आवडत्या अॅपवर IRCTC iMudra वर VISA/RuPay कार्डचा वापरुन पैसे भरावे आणि 5000 रुपयांपेक्षा अधिक खर्च केल्यानंतर 2000 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळेल, असे IRCTC iMudra ने ट्विटमध्ये म्हटले आहे. दरम्यान, ही ऑफर 28 फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. हे कार्ड फेडरल बँकेच्या सहकार्याने आयआरसीटीसीने लाँच केले होते. भारतीय वेबसाइटवर खरेदी, पैसे ट्रान्सफर आणि एटीएममधून पैसे काढण्यासाठी आयमुद्रा व्हिसा कार्डचा वापर केला जाऊ शकतो. तुम्ही केवळ भारतीय वेबसाइटवर खरेदी करण्यासाठी आपले iMudra व्हिसा कार्ड वापरू शकता. यासह खरेदी केवळ भारतीय चलनातच झाली पाहिजे. तुमच्या IRCTC iMudra वॉलेटमध्ये पैसे अॅड करण्यासाठी तुम्ही डेबिट कार्ड, यूपीआय किंवा क्रेडिट कार्ड वापरू शकता. पैसे अॅड करण्यासाठी तुमच्या iMudra अॅपवर अॅड मनी ऑप्शनवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला रक्कम निवडावी लागेल आणि ती वॉलेटमधे अॅड करावी लागेल. याचबरोबर, या अॅपद्वारे तुम्ही पाण्याचे बिलही भरू शकता. याशिवाय, ऑनलाइन आणि ऑफलाइन शॉपिंगद्वारे तुम्ही मित्र आणि कुटुंबीयांना पैसेही पाठवू शकता. तसेच, या सुविधेद्वारे एटीएममधून पैसे काढू शकता, परंतु त्यासाठी आयआरसीटीसी iMudra वर साइन अप करणे आवश्यक आहे. या अॅपमध्ये युजर्सला टॅप अँड पे (Tap & Pay)ची सुविधा मिळते.टॅग्स :आयआरसीटीसीरेल्वेभारतीय रेल्वेव्यवसायपैसाIRCTCrailwayIndian RailwaybusinessMONEY