लय़ भारी! फेस्टिव्ह सीझनमध्ये शॉपिंगचं नो टेन्शन; मनपसंत खरेदी करा अन् महिन्याभराने पैसे भरा By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 02:30 PM 2021-10-28T14:30:32+5:30 2021-10-28T15:03:08+5:30
Buy Now Pay Later Service : सणासुदीच्या काळात ई-कॉमर्स कंपन्यांकडून देखील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी भरपूर ऑफर्सही दिल्या जातात. ऑनलाईन खरेदी करण्याकडे अनेकांचा अधिक कल असतो. सणासुदीच्या काळात ई-कॉमर्स कंपन्यांकडून देखील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी भरपूर ऑफर्सही दिल्या जातात. ऑफर्स असल्याने ग्राहक देखील ऑनलाईन वस्तू खरेदी करण्यास प्राधान्य देतात.
देशातील अनेक कंपन्या 'बाय नाऊ पे लेटर'ची सुविधा देत आहेत. ही संकल्पना अधिकाधिक लोकप्रिय होत आहे. या व्याजमुक्त कर्ज (Interest Free Loan Service) सुविधेअंतर्गत, तुम्ही कोणतीही वस्तू खरेदी करू शकता आणि काही दिवसांनंतर पैसे देऊ शकता.
डिजिटल पेमेंट आणि वित्तीय सेवा कंपनी पेटीएम (Paytm Postpaid Service) देखील बाय नाऊ पे लेटरची (Paytm Buy Now Pay Later Service) सुविधा देत आहे. कंपनीने या सेवेला पेटीएम पोस्टपेड असे नाव दिले आहे.
पेटीएम पोस्टपेड आपल्या युजर्सना प्रोफाइलनुसार क्रेडिट मर्यादा देते. युजर्स क्रेडिट मर्यादेत खर्च करू शकतात आणि पुढील महिन्यात पेमेंट करू शकतात. तुम्ही पेटीएम अॅपवर रिचार्ज, बिल पेमेंट किंवा खरेदी इत्यादींसाठी पेटीएम पोस्टपेड सेवा वापरू शकता.
विशेष बाब म्हणजे पेटीएम पोस्टपेड युजर्स त्यांच्या आजूबाजूच्या किराणा दुकानातूनही याद्वारे खरेदी करू शकतात. तुम्ही पेटीएम पोस्टपेड सेवेसाठी पात्र असल्यास तुम्ही खाली दिलेली प्रक्रिया फॉलो करून पेटीएम पोस्टपेड सेवा सुरू करू शकता.
पेटीएम एप अपडेट करा आणि खात्यात लॉग इन करा. होमपेजवर कर्ज आणि क्रेडिट कार्ड (Loans & Credit Cards) विभागात पेटीएम पोस्टपेडचा पर्याय दिसतो. अॅपमध्ये सर्च केल्यानंतरही पेटीएम पोस्टपेडचा पर्याय येतो.
त्यानंतर पेटीएम पोस्टपेड आयकॉनवर क्लिक करा.यानंतर केवायसी पूर्ण करा. केवायसीची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल आहे. केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, तुमची पेटीएम पोस्टपेड सेवा सक्रिय होईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.