paytm starts charging more than 2 percent from selected user if you add money through a credit card
Paytm युजर्संना झटका! आता क्रेडिट कार्डद्वारे वॉलेटमध्ये पैसे अॅड करणे झाले आणखी महाग!! By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2021 05:56 PM2021-02-03T17:56:19+5:302021-02-03T18:09:42+5:30Join usJoin usNext नवी दिल्ली : किराणा दुकानातून वस्तू खरेदी करण्यासाठी, पाणी व विजेची बिले भरण्यासाठी, गॅस सिलिंडर बुक करण्यासाठी, मोबाईल व डीटीएच रिचार्ज करण्यासाठी किंवा ऑनलाइन ऑर्डरसाठी तुम्ही पेटीएम वॉलेट (Paytm Wallet) वापर करत असाल. पेटीएम सर्वाधिक प्रसारामुळे देशभरातील सर्वात मोठा डिजिटल पेमेंट पर्याय म्हणून उदयास आले आहे. यामुळे क्रेडिट कार्डमधून (Credit Card) पेटीएम वॉलेटमध्ये पैसे भरून लोक छोटे-मोठे व्यवहार करीत आहेत. जर तुम्हीही सामान्य व्यवहारासाठी पेटीएम वापरत असाल तर तुमच्यासाठी ही वाईट बातमी आहे. पेटीएमचा वापर करणे पुन्हा महाग झाले आहे. paytmbank.com/ratesCharges वर दिलेल्या माहितीनुसार, आता जर एखादा युजर पेटीएम वॉलेटमध्ये क्रेडिट कार्डद्वारे पैसे अॅड करत आहे, तर त्याला अडीच टक्के अतिरिक्त शुल्क भरावे लागेल. पेटीएमच्या वेबसाइटनुसार, हा नियम 15 जानेवारी 2021 पासून लागू झाला आहे. अमेरिकन एक्सप्रेसच्या क्रेडिट कार्डमधून पैसे अॅड करण्यासाठी तुम्हाला 3 टक्के अतिरिक्त शुल्क भरावे लागेल. विशेष म्हणजे, अनेक युजर्सनी पेटीएम वॉलेटमध्ये क्रेडिट कार्डद्वारे पैसे अॅड केल्यानंतर 2.07 टक्के शुल्क आकारला जात असल्याची तक्रार केली आहे. तर काही युजर्स म्हणतात की, ते त्यांना 4.07 टक्के शुल्क लागत आहे. याआधी 15 ऑक्टोबर 2020 पासून एखादी व्यक्ती क्रेडिट कार्डमधून पेटीएम वॉलेटमध्ये पैसे अॅड करत होती, तर त्या व्यक्तीला 2 टक्के अतिरिक्त शुल्क भरावा लागत होता. उदाहरणार्थ, जर तुम्ही क्रेडिट कार्डमधून पेटीएम वॉलेटमध्ये 100 रुपये अॅड करत होता, तर तुमच्या क्रेडिट कार्डमधून 102 रुपयांचे पेमेंट करावे लागत होते. दरम्यान, कोणत्याही व्यापारी साइटवर (मर्चेंट साइट) पेटीएममधून पेमेंट केल्यानंतर कोणतेही अतिरिक्त शुल्क द्यावे लागत नाही. पेटीएमवरून पेटीएम वॉलेटमध्ये ट्रान्सफर केल्यानंतर सुद्धा कोणतेही शुल्क आकारले जात नाही. तसेच, पेटीएम वॉलेटमध्ये डेबिट कार्ड किंवा नेटबँकिंगसह पैसे अॅड केल्यानंतरही कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. यापूर्वी 1 जानेवारी 2020 रोजी देखील नियमांमध्ये बदल करण्यात आला होता. महिन्यात क्रेडिट कार्डमधून 10 हजार रुपयांहून अधिक रक्कम अॅड केल्यानंतर कंपनीने 2 टक्के शुल्क आकारण्यास सुरवात केली होती.टॅग्स :पे-टीएमव्यवसायपैसाPaytmbusinessMONEY