Pensioners, no tension; You will get a Jeevan Pramaan life certificate at home!
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच! By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 03:01 PM2024-11-25T15:01:25+5:302024-11-25T15:17:13+5:30Join usJoin usNext Jeevan Pramaan : पेन्शनधारकांना पोस्टमनच्या माध्यमातून जीवन प्रमाणपत्र घरपोच मिळणार आहे. पेन्शनधारकांना जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी बँक, पेन्शन विभाग किंवा पेन्शन वितरण संस्थेच्या कार्यालयात जाण्याची आता गरज नाही. कारण, डिजिटल लाईफ सर्टिफिकेट आता घरपोच किंवा पोस्ट ऑफिसमध्ये मिळणार आहे. पेन्शनधारकांना पोस्टमनच्या माध्यमातून जीवन प्रमाणपत्र घरपोच मिळणार आहे. ते पोस्ट ऑफिसमध्येही उपलब्ध आहे. आधार प्रमाणीकरणासह डिजिटल लाईफ सर्टिफिकेट पूर्णपणे पेपरलेस असल्याने त्वरित मिळेल.हयात प्रमाणपत्र देण्याची अंतिम तारीख काय? हयात प्रमाणपत्र देण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबरपर्यंत असल्याने कागदपत्रांसह अर्ज वेळेवर दाखल करावा लागणार आहे.इंडिया पोस्टद्वारे डिजिटल सर्टिफिकेट पोस्ट पेमेंट्स बँकेच्या माध्यमातून डिजिटल लाईफ सर्टिफिकेट तयार करून मिळणार आहे. यासाठी आवश्यक कागदपत्रे जोडावी लागणार आहेत.पोस्टमनकाका घरपोच दाखला देणार! पेन्शनधारकांना हयातीचा दाखला मिळवण्यासाठी पेन्शन विभाग किंवा बँकेत जाण्याची गरज नाही. आवश्यक ती कागदपत्रे सादर केल्यानंतर ७० रुपये एवढ्या नाममात्र शुल्कात हा दाखला पोस्ट पेमेंट्स बँकेच्या माध्यमातून पोस्टमन घरपोच देणार आहेत.सर्टिफिकेटसाठी कागदपत्रे पेन्शनधारकांनी डिजिटल लाईफ सर्टिफिकेट तयार करण्यासाठी पेन्शन आयडी, पेन्शन पेमेंट ऑर्डर, पेन्शन वितरण विभाग, पेन्शन खाते असणाऱ्या बँकेचे नाव, मोबाईल नंबर व आधार क्रमांक आवश्यक आहे. प्रमाणपत्र बनण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पेन्शनधारकांना मोबाईल क्रमांकावर एसएमएस येतो.हयात दाखला न दिल्यास पेन्शन बंद ! पेन्शनधारकांनी हयातीचा दाखला वेळेत सादर न केल्यास त्यांची पेन्शन बंद होऊ शकते. त्यामुळे पेन्शनधारकांनी हा दाखला वेळेत सादर करणे आवश्यक आहे. संकेतस्थळावरही प्रमाणपत्र दिसणार प्रमाणपत्र तयार झाल्यानंतर पेन्शनधारकांना https://jeevanpramaan.gov.i n/ppous er/login या संकेतस्थळावर हे प्रमाणपत्र पाहता येईल.टॅग्स :ज्येष्ठ नागरिकनिवृत्ती वेतनSenior CitizenPension