Share Market: करोडपती होण्याच्या नादात लोकांनी खरेदी केले 'हे' शेअर्स, आता गुंतवणूकदारांना करतायत 'कंगाल'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 10:59 PM2022-11-18T22:59:51+5:302022-11-18T23:07:34+5:30

आज आम्ही आपल्याला काही अशा शेअर्ससंदर्भात माहिती देणार आहोत, ज्यांनी 2021 मध्ये आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल बनवले आणि 2022 मध्ये कंगाल केले.

शेअर मार्केटमध्ये असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी 2021 मध्ये चांगले परफॉर्म केले, मात्र 2022 मध्ये ते अपेक्षेप्रमाणे परफॉर्म करू शकले नाही. 2021 मध्ये असे अनेक शेअर्स होते, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. पण आज आम्ही आपल्याला काही अशा शेअर्ससंदर्भात माहिती देणार आहोत, ज्यांनी 2021 मध्ये आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल बनवले आणि 2022 मध्ये कंगाल केले.

पेटीएमचा शेअर नोव्हेंबर 2021 मध्ये लिस्ट झाला होता. हा शेअर एकेकाळी 1,955 रुपयांपर्यंत पोहोचला होता. त्यावेळी या शेअरमध्ये ज्या लोकांनी गुंतवणूक केली असेल, त्यांचे आता मोठे नुकसान झाले आहे. Paytm चा शेअर शुक्रवारी 6 रुपयांनी वाढून 546.40 रुपयांवर बंद झाला आहे. या शेअरमध्ये ज्यांनी एक लाख रुपयांची गुंतवणूक केली होती, त्याचे आता 40 हजार रुपये झाले आहेत.

धानी सर्व्हिसेसच्या स्टॉकची स्थितीही वाईटच आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये 268 रुपयांच्या लाइफटाइम हायवर पोहोचलेला हा शेअर 48 रुपयांपर्यंत खाली आला आहे. या शेअरची 52 आठवड्यांची उच्च पातळी 180.90 रुपये आहे.

3I इन्फोटेकचा शेअर शुक्रवारी 42 रुपयांवर बंद झाला. डिसेंबर 2021 मध्ये, हा शेअर लाइफ टाइम हाय 119.30 रुपयांवर होता. मात्र आता त्यात ५२ टक्क्यांहून अधिकची घसरण दिसून येत आहे.

ऑक्टोबर 2021 मध्ये 1279.26 रुपयांच्या पातळीवर पोहोचलेला IRCTC (IRCTC) चा शेअर शुक्रवारी 718 रुपयांवर आला आहे. या शेअरची 52 आठवड्यांची उच्च पातळी पाहिली तर तो 919.70 रुपयांवर होता. ज्यांनी या शेअरमध्ये 1279 रुपयांवर असताना गुंतवणूक केली, ते आज मोठ्या तोट्यात आहेत.

इन्फो एज इंडियाचा शेअर 7,465.40 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचल्यानंतर, आता कंसोलिडेशनच्या टप्प्यात आहे. हा शेअर आता 3,900 रुपयांवर व्यवहार करत आहे. या शेअरमध्ये एका वर्षात सुमारे 36 टक्क्यांची घसरण झाली आहे.