LIC Jeevan Labh Plan : रोज वाचवा २५३ रूपये, जमेल ५४ लाखांचा फंड; पाहा LIC च्या स्कीमच्या विशेष बाबी By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2022 05:44 PM 2022-09-13T17:44:40+5:30 2022-09-13T17:51:19+5:30
LIC Jeevan Labh Plan : सध्याच्या काळात इन्शूरन्स आणि बचत या दोन महत्त्वाच्या बाबी आहेत. LIC Jeevan Labh Plan : विमा आणि बचत या आजच्या काळाच्या दोन प्रमुख गरजा आहेत. विमा तुमच्या कुटुंबातील सदस्यांना कोणतीही अनुचित घटना घडल्यास आर्थिक संरक्षण प्रदान करते. त्याच वेळी, आपला मोठा खर्च भागविण्यासाठी बचत करणे खूप महत्वाचे आहे. एलआयसी त्यांच्या पॉलिसींमध्ये ग्राहकांना विमा आणि बचत दोन्ही सुविधा पुरवते.
अशीच एक योजना म्हणजे LIC जीवन लाभ योजना. ही योजना ग्राहकांना बचत, चांगला परतावा आणि विमा संरक्षण तिन्ही प्रदान करते. या योजनेद्वारे, तुम्ही चांगली रक्कम जमा करू शकता. तुम्ही दिवसाला फक्त 253 रुपये गुंतवून 54 लाख रुपयांचा निधी तयार करू शकता.
या योजनेतील विशेष बाबी म्हणजे लाँग टर्म पोर्टेक्शनचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना मर्यादित कालावधीसाठी प्रीमिअम भरावा लागतो. 2 वर्षे नियमितपणे प्रीमियम भरल्यानंतर पॉलिसीधारक या योजनेवर कर्ज घेऊ शकतात. सरंडर व्हॅल्यूच्या 90 टक्क्यांपर्यंत यावर कर्ज मिळते.
हा प्लॅन 5,10,15 वर्षांच्या हप्त्यांमध्ये डेथ आणि मॅच्युरिटी बेनिफिट्स देण्याचा पर्यायही देतो. जर मुलांसाठी हा प्लॅन खरेदी केली असेल, तर पालक पॉलिसीमध्ये LIC च्या प्रीमियम वेव्हर बेनिफिट रायडरला जोडू शकतात. पालकांचा मृत्यू झाल्यास LIC भविष्यातील प्रीमियम्स माफ करते. यासह, पॉलिसी सुरू ठेवण्यासाठी मुलाला प्रीमियमचा भार सहन करावा लागत नाही. जर विमा रक्कम 5 लाख आणि त्यापेक्षा जास्त असेल तर प्रीमियम रकमेवर सूट मिळू शकते.
आता तुम्ही दरवर्षी 92,400 रुपये प्रीमियम म्हणून जमा कराल. महिन्याच्या हिशोबानं बघितले तर रोजचे 7,700 रुपये आणि 253 रुपये असतील. यानंतर, पॉलिसी मॅच्युअर झाल्यावर, तुम्हाला 54.50 लाख रुपये मिळतील.
यावर तुम्हाला आयकरातही सूट मिळते. पॉलिसीच्या प्रीमिअमच्या रूपात एका आर्थिक वर्षात भरलेल्या कमाल 1.5 लाख रूपयांच्या रकमेवर आयकर अधिनियमाच्या कलम 80 सी नुसार सूट देण्यात येते.