पीएफ, व्याजदरापासून ते अॅमेझॉन, ओटीटीपर्यंत; १ सप्टेंबरपासून हे नियम बदलणार, तुमच्या खिशावर असा परिणाम होणार By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2021 09:16 AM 2021-08-29T09:16:46+5:30 2021-08-29T09:33:14+5:30
Changes from 1 September 2021: पुढील महिन्यात १ सप्टेंबरपासून ईपीएफपासून ते चेक क्लिअरिंगपर्यंतचे नियम आणि बचत खात्यावरील व्याजापासून सिलेंडरचे दर, कार ड्रायव्हिंग आणि गुगल, गुगल ड्राईव्ह आणि अॅमेझॉनसारख्या सेवांपर्यंतच्या विविध नियमांमध्ये मोठे फेरबदल दिसून येणार आहेत. या बदलांबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे आहे.... पुढील महिन्यात १ सप्टेंबरपासून दैनंदिन व्यवहारातील विविध नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत. याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. हे बदल सर्वसामान्यांपासून ते श्रीमंतांपर्यंत सर्वांच्या आर्थिक व्यवहारांना थेटपणे प्रभावित करणार आहे. ईपीएफपासून ते चेक क्लिअरिंगपर्यंतचे नियम आणि बचत खात्यावरील व्याजापासून सिलेंडरचे दर, कार ड्रायव्हिंग आणि गुगल, गुगल ड्राईव्ह आणि अॅमेझॉनसारख्या सेवांपर्यंतच्या विविध नियमांमध्ये मोठे फेरबदल दिसून येणार आहेत. या बदलांबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे आहे....
पीएफच्या नियमांमध्ये होणार बदल नोकरदार व्यक्तींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. ती म्हणजे पुढील महिन्यात १ सप्टेंबरपासून जर तुमचा युनिव्हर्सल अकाऊंट नंबर आधार कार्डशी लिंक नसेल तर तुमचे एम्प्लॉयर तुमच्या प्रॉव्हिडंट फंडाच्या अकाऊंटमध्ये पैसे क्रेडिट करू शकणार नाहीत. ईपीएफओने ईपीएफधारकांना १ सप्टेंबरपूर्वी आधारकार्डला यूएन नंबरशी लिंक करावे लागेल.
चेक क्लिअरिंगचा नियम बदलणार जर तुम्ही चेकच्या माध्यमातून पैसे पाठवत असाल किंवा चेक पेमेंट करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. आता १ सप्टेंबरपासून ५० हजार रुपयांपेक्षा अधिकचा चेक जारी करणे तुमच्यासाठी काहीसे त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. कारण बँकांनी आता पॉझिटिव्ह पे सिस्टिम लागू करण्यास सुरुवात केली आहे. अॅक्सिस बॅक पुढील महिन्यापासून पॉझिटिव्ह पे सिस्टिम लागू करणार आहे.
पीएनबीच्या सेव्हिंग अकाऊंटवरील व्याज घटणार पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांना पुढच्या महिन्यात जोरदार धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण पंजाब नॅशनल बँक १ सप्टेंबर २०२१पासून बचत खात्यामध्ये जमा होणाऱ्या व्याजामध्ये कपात करण्याची शक्यता आहे. ही माहिती बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून देण्यात आली आहे. बँकेने बचत खात्यावरील व्याजदर वार्षिक ३ टक्क्यांवरून घटवून २.९० टक्के केला आहे. या निर्णयाचा परिणाम नव्या आणि जुन्या अशा दोन्ही ग्राहकांवर होणार आहे.
गॅस सिलेंडरच्या किमती प्रत्येक महिन्याप्रमाणे १ सप्टेंबरपासूनही गॅस सिलेंडरच्या किमती बदलणार आहेत. महिन्याच्या पहिल्या तारखेला घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरच्या किमतींमध्ये बदल होत असतो. दरम्यान, धारानौला गॅस सर्विसकडून गॅस वितरणाच्या वेळेत बदल होणार आहे. नगरसह ग्रामीण भागांमध्ये गॅस वाटपाच्या वेळेत बदल केला आहे.
कार विम्याचा नियम बदलणार मद्रास हायकोर्टाने एक महत्त्वपूर्ण आदेश देताना १ सप्टेंबरपासून कुठलेही वाहन विक्रीस गेल्यावर त्याच्यासाठी बंपर टू बंपर इन्श्योरन्स अनिवार्य असेल असे सांगितले आहे. हा इन्श्योरन्स ५ वर्षांच्या काळासाठी ड्रायव्हर पॅसेंजरआमि वाहन मालकांना कव्हर करणाऱ्या इन्श्योरन्स व्यतिरिक्त असेल. बंपर टू बंपर इन्श्योरन्समध्ये वाहनाच्या त्या भागांनाही विम्याचे संरक्षण मिळेल, ज्यावर सर्वसाधारणपणे विमा कंपन्या विमा संरक्षण देत नाही.
ओटीटी अॅप सब्स्क्रिप्शन महागणार १ सप्टेंबरपासून भारतामध्ये ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्नी+हॉटस्टारचे सब्स्क्रिप्शन महाग होणार आहे. युझर्सला या सब्स्क्रिप्शनच्या बेस प्लॅनसाठी ३९९ रुपयांऐवजी ४९९ रुपये मोजावे लागणार आहेत. याचाच अर्थ युझर्सला १०० रुपये अतिरिक्त द्यावे लागतील. तर ८९९ रुपयांमध्ये ग्राहकांना दोन फोनमध्ये डिस्नी+हॉटस्टार अॅप सुरू करता येईल. तसेच या सब्स्क्रिप्शन प्लॅनमध्ये एचडी क्वालिटी मिळेल. १४९९ रुपयांमध्ये ४ स्क्रीनवर हे अॅप चालवता येईल.
अॅमेझॉनवरून सामान मागवणे महागणार १ सप्टेंबरपासून अॅमेझॉनवरून सामान मागवणे महागणार आहे. कंपनी डिझेल आणि पेट्रोलच्या किमतींमध्ये वाढ झाल्याने लॉजिस्टिक कॉस्टमध्ये वाढ करू शकते. अशा परिस्थितीत ५०० ग्रॅमच्या पॅकेजसाठी ५८ रुपये द्यावे लागतील. रीजनल कॉस्ट ३६.५० रुपये असेल.
बनावट अँड्रॉईड अॅप होणार बंद गुगलचे नवे धोरण १ सप्टेंबरपासून लागू होणार आहे. त्याअंतर्गत चुकीच्या आणि बनावट कंटेंटला प्रमोट करणाऱ्या अॅपवर १ सप्टेंबरपासून निर्बंध लागू होती. गुगलने आपल्या पोस्टमध्ये सांगितले की, अॅप डेव्हलपर्सकडून दीर्घकाळापर्यंत वापरण्यात न आलेल्या अॅपना ब्लॉक करण्यात येईल. गुगलकडून गुगल प्ले स्टोअर्सच्या नियमांना आधीपेक्षा अधिक कठोर बनवण्यात येत आहे. तसेच गुगल युझर्सला पुढच्या १३ सप्टेंबरला नवा सिक्युरिटी अपडेट मिळेल. त्यामधून गुगल ड्राईव्हचा वापर आधीच्या पेक्षा अधिक सुरक्षित होणार आहे.