PM Jandhan: जनधन खात्यावर मोफत मिळतेय 2.30 लाखांची सुविधा, जाणून घ्या सविस्तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2022 12:03 PM2022-01-08T12:03:52+5:302022-01-08T12:17:13+5:30

PM Jandhan: या योजनेंतर्गत उघडलेल्या खात्यांची संख्या काही वर्षांत तिप्पट झाली आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या पंतप्रधान जनधन योजनेला (PM Jan Dhan Yojana) 7 वर्षे पूर्ण झाली आहेत. सरकारची ही योजना सर्वसामान्यांना खूप आवडली आहे. या योजनेंतर्गत उघडलेल्या खात्यांची संख्या काही वर्षांत तिप्पट झाली आहे.

डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेसने (DFS) ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. पंतप्रधान जन धन योजनेच्या खात्यांमध्ये (Jan Dhan Account) तीन पटीने वाढ झाल्याचे ट्विटमध्ये म्हटले आहे. मार्च 2015 मधील खात्यांची संख्या 14.72 कोटींवरून 43 कोटींवर गेली आहे.

या जगातील सर्वात मोठ्या आर्थिक समावेशन उपक्रमाने गरीब लोकांसाठी बँकांचे दरवाजे उघडले आहेत आणि त्यांना जन धन खाते पासबुक आणि रुपे कार्डची नवीन शक्ती दिली आहे. या योजनेअंतर्गत, खाते उघडल्यानंतर, प्रत्येकाला स्वस्त विमा, पेन्शन आणि इतर आर्थिक उत्पादनांची सुविधा दिली जाते.

जन धन खातेधारकांना 2.30 लाख रुपयांचा लाभ दिला जातो. जन धन खातेधारकांना कोणत्याही बँकेत खाते उघडल्यावर अपघाती विमा संरक्षण दिले जाते. खातेदारांना 1,00,000 रुपयांचा अपघाती विमा आणि 30,000 रुपयांचा सामान्य विमा दिला जातो. जर जनधन खातेधारकाचा अपघात झाल्यास त्याला 30 हजार रुपये दिले जातात. खातेदाराचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपये दिले जातात. अशाप्रकारे जन धन खातेधारकाला 2.30 लाख रुपयांपर्यंत लाभ मिळू शकतो.

प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये जास्त खाते उघडले जाते. परंतु, जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तुमचे जनधन खाते खाजगी बँकेत देखील उघडू शकता. तुमचे दुसरे बचत खाते असल्यास तुम्ही ते जनधन खात्यातही बदलू शकता. भारतात राहणारा कोणताही नागरिक, ज्याचे वय 10 वर्षे किंवा त्याहून अधिक आहे, तो जनधन खाते उघडू शकतो.

जनधन खाते उघडण्यासाठी केवायसी अंतर्गत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केले जाते. आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, मनरेगा जॉब कार्ड या डॉक्युमेंट्सचा वापर करून जनधन खाते उघडता येते.

प्रधानमंत्री जनधन योजना (PMJDY) अंतर्गत, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये खाते जास्त उघडले जाते. तुम्ही कोणत्याही सरकारी बँकेत जनधन खाते उघडू शकता. परंतु, जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तुमचे जनधन खाते खाजगी बँकेत देखील उघडू शकता.

धनलक्ष्मी बँक, येस बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक, फेडरल बँक, आयएनजी वैश्य, कोटक महिंद्रा, कर्नाटक बँक, इंडसइंड बँक जनधन खाते उघडण्याची सुविधा प्रदान करतात.