शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 07:28 PM2024-09-25T19:28:41+5:302024-09-25T19:45:44+5:30

PM Kisan : सरकारने या योजनेचा १८ वा हप्ता जारी करण्याची तारीख जाहीर केली आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या ‘पीएम किसान सन्मान निधी’ (PM Kisan) योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. नवरात्री दरम्यान देशातील जवळपास ९ कोटी गरीब शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत दोन हजार रुपये मिळतील.

सरकारने या योजनेचा १८ वा हप्ता जारी करण्याची तारीख जाहीर केली आहे. पीएम किसान योजनेच्या वेबसाइटनुसार, या योजनेचा १८ वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ ऑक्टोबर २०२४ रोजी जारी करतील. या योजनेला संपूर्णपणे केंद्र सरकारकडून वित्तपुरवठा केला जातो.

दरम्यान, तुम्हाला तुमच्या खात्यात पीएम किसान योजनेचे पैसे मिळवायचे असतील, तर तुम्हाला पीएम किसान पोर्टलवर ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. ज्यांच्याकडे पीएम किसानचे ई-केवायसी नाही त्यांना योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी येतील.

पीएम किसान पोर्टलवर, तुम्ही मोबाइल नंबर आणि आधार कार्डच्या मदतीने ओटीपीच्या मदतीने तुमचे ई-केवायसी करू शकता. जर तुम्ही हे करू शकत नसाल, तर तुम्ही तुमच्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरला (CSC) भेट देऊन ई-केवायसी काम पूर्ण करू शकता.

केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी २०१५ साली पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा फायदा देशातील लाखो अल्पभूधारक शेतकऱ्यांना होत आहे.

पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळतात. सरकारकडून ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ऑनलाइन ट्रान्सफर करण्यात येते.

दरम्यान, पीएम किसान योजनेशी संबंधित कोणत्याही समस्येसाठी, तुम्ही पीएम किसान योजनेच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधू शकता. याशिवाय, तुम्ही पीएम किसान योजनेचे स्टेटस चेक करण्यासाठी १५५२६१ वर कॉल करू शकता.