PM-KISAN: 42 लाख अपात्र शेतकऱ्यांनी घेतले 3000 कोटी रुपये; आता सरकार करणार वसूली...! By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 05:40 PM 2021-07-22T17:40:23+5:30 2021-07-22T17:46:29+5:30
PM Kisan Samman Nidhi : यासंदर्भात, आता 42.16 लाख अपात्र शेतकऱ्यांकडून एकूण 2992.75 कोटी रुपयांची रिकव्हरी करायची आहे, असे केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी लोकसभेत सांगितले. केंद्र सरकारच्या अनेक प्रयत्नांनंतरही पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेत गोंधळ होत आहे. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या मते 42 लाखहून अधिक अपात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2900 कोटी रुपयांपेक्षाही अधिक पैसे ट्रान्सफर केले गेले आहे. (PM-KISAN: 42 lakh ineligible farmers took Rs 3,000 crore, Now the Modi government will recover)
हे पैसे अशा शेतकऱ्यांच्या खात्यात गेले आहेत, जे शेतकरी PM-KISAN योजनेच्या अटी पूर्ण करत नाहीत.
सरकार करणार वसूली - यासंदर्भात, आता 42.16 लाख अपात्र शेतकऱ्यांकडून एकूण 2992.75 कोटी रुपयांची रिकव्हरी करायची आहे, असे केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी लोकसभेत सांगितले.
या अपात्र शेतकऱ्यांची सर्वाधिक संख्या आसाम, तामिळनाडू, छत्तीसगड, पंजाब आणि बिहारमध्ये आहे.
नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितल्यानुसार, आसाममधील एकूण 8.35 लाख अपात्र शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये 554.01 कोटी रुपये ट्रान्सफर झाले आहेत.
याशिवाय, पंजाबमध्ये जवळपास 438 कोटी, महाराष्ट्रात जवळपास 358 कोटी, तामिळनाडूतील अपात्र शेतकऱ्यांकडून 340.56 कोटी आणि उत्तर प्रदेशातील अपात्र शेतकऱ्यांकडून 258.64 कोटी रुपयांची वसुली करण्यात येणार आहे.
योजनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे, पीएम-किसानसाठी लाभार्थ्यांची ओळख पटविण्याची जबाबदारी राज्यांची आहे.
आयकर रिटर्न फाइल करणाऱ्या अथवा सरकारी नौकरी करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेपासून दूर ठेवण्यात आले आहे.
दर वर्षी मिळतात 6 हजार रुपये - पंतप्रधान किसान सन्मान निधीअंतर्गत सरकार वर्षाला 6 हजार रुपये देते. ही रक्कम चार महिन्यातून एकदा मिळते. ही योजना 2019मध्ये सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत आठ हप्ते आले आहेत.
गेल्या मे महिन्यात या योजनेअंतर्गत 9 कोटी 50 लाख लाभार्थी शेतकऱ्यांना 20 हजार कोटी रुपयांहून अधिक पैसे ट्रान्सफर करण्यात आले होते. याअंतर्गत प्रत्येक लाभार्थ्याच्या खात्यावर 2 हजार रुपये जमा करण्यात आले.