PM Kisan FPO Yojana : 'या' योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना करू शकतं १५ लाखांची मदत; जाणून घ्या अर्ज कसा करावा?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 12:36 PM2024-10-14T12:36:30+5:302024-10-14T12:49:18+5:30

PM Kisan FPO Yojana : भारतातील शेतकऱ्यांसाठी सरकार अनेक योजना राबवत आहे.

भारत सरकारकडून देशातील लोकांसाठी विविध योजना राबवल्या जातात. देशातील अनेक लोक शेतीतून आपला उदरनिर्वाह करतात. त्यामुळं देशातील शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारकडून विशेष लक्ष दिलं जातं. भारतातील शेतकऱ्यांसाठी सरकार अनेक योजना राबवत आहे.

ज्याचा शेतकऱ्यांना फायदा होतो. भारतातील अनेक शेतकरी अजूनही कमी उत्पन्न गटातील आहेत. त्यांना आर्थिक लाभ देण्यासाठी सरकारनं प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. ज्यामध्ये शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपये दिले जातात.

याशिवाय, सरकार शेतकऱ्यांसाठी आणखी एक योजना राबवत आहे. ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या व्यवसायासाठी आर्थिक मदत दिली जाते. ही योजना काय आहे आणि या योजनेसाठी कोणी अर्ज कसा करू शकतो, याबाबत जाणून घ्या.

शेतकऱ्यांना व्यावसायिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी भारत सरकारनं पीएम किसान एफपीओ (FPO) योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत ११ शेतकऱ्यांच्या गटाला म्हणजेच शेतकरी उत्पादक संघटना (FPO) यांना शेतीशी संबंधित व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारकडून १५ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.

या योजनेच्या माध्यमातून सरकारला शेतकरी उत्पादक संघटनेच्या मदतीने शेती क्षेत्र अधिक बळकट करायचे आहे. जर कोणत्याही एकट्या शेतकऱ्याला केवळ योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा असेल तर त्याला लाभ मिळणार नाही. यासाठी शेतकरी उत्पादक संघटना (FPO) ही संघटना स्थापन करावी लागेल. शेतकऱ्यांच्या या संघटनेत किमान ११ जण असणे आवश्यक आहे. तरच तुम्हाला या सरकारी योजनेचा लाभ मिळू शकेल.

जर तुम्ही देखील शेतकरी असाल आणि शेतकरी उत्पादक संघटना (FPO) तयार करण्यास सक्षम असाल. तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://www.enam.gov.in वर जावं लागेल.

यानंतर, होमपेजवर रजिस्ट्रेशन केल्यानंतर, तुम्हाला लॉगिन करावं लागेल. त्यानंतर सर्व माहिती भरावी लागेल आणि फॉर्म सबमिट करावा लागेल. योजनेत रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला एफपीओचे एमडी किंवा सीईओ किंवा मॅनेजरचे नाव, पत्ता, ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर द्यावा करावा लागेल.