PM Kisan Scheme : शेतकर्‍यांसाठी आनंदाची बातमी, आजपासून जमा होणार आठवा हप्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2021 04:06 PM2021-04-01T16:06:54+5:302021-04-01T16:27:47+5:30

PM Kisan Scheme : शेतकर्‍यांच्या बँक खात्यात 2000 रूपये जमा होण्यास सुरुवात होईल.

नवी दिल्ली : पंतप्रधान किसान सन्मान निधीमधील (PM Kisan Samman Nidhi) आठव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकर्‍यांसाठी आनंदाची बातमी आहे.

1 एप्रिलपासून म्हणजेच आजपासून देशातील 11,66 कोटी शेतकर्‍यांच्या बँक खात्यात 2000 रूपये जमा होण्यास सुरुवात होईल.

दरम्यान, आजपासून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत नोंदणीकृत (रिजस्टर्ड) शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आठवा हप्ता जमा होणार आहे.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून देशातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्षाला सहा हजार रुपये जमा केले जातात. 6 हजार रूपयांची ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग (Direct Benefit Transfer) केली जाते.

पहला हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्चदरम्यान करण्यात येतो, तर दुसरा हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै दरम्यान आणि तिसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जातो.

जर कागदपत्रे योग्य असतील तर सर्व 11.66 कोटी नोंदणीकृत शेतकर्‍यांना आठव्या हप्त्याचा लाभ देखील मिळेल. यासाठी शेतकऱ्यांनी आपली नोंद तपासावी.

जेणेकरून पैसे मिळण्यास कोणतीही अडचण उद्भवणार नाही. नोंदणीमध्ये काही गडबड असल्यास तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही.

योजनेंतर्गत तुम्ही घरी ऑनलाईन अर्ज (नोंदणी) करू शकता. यासाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी किंवा त्यामध्ये काही बदल करण्यासाठी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या वेबसाइटवरून करता येणार आहे.

यासाठी प्रथम www.pmkisan.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. वेबसाइटच्या पहिल्या पानावर, फार्मर्स कॉर्नर उजव्या बाजूला मोठ्या अक्षरे लिहिलेले आहे.

आपले नाव सूचीमध्ये आहे की नाही हे आपण पाहू इच्छित असल्यास आपल्याला लाभार्थी यादी / Beneficiary list वर क्लिक करावे लागेल. यानंतर आपण आपले नाव राज्य, जिल्हा, उपजिल्हा, गट आणि गाव यांचे नाव भरून तपासू शकता.