...म्हणून अनेक शेतकऱ्यांना मिळाले नाहीत 6000 रुपये; आता करावे लागेल 'हे' काम By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2021 10:30 AM 2021-03-03T10:30:40+5:30 2021-03-03T11:22:37+5:30
pm kisan samman nidhi scheme : पंतप्रधान किसान सन्मान निधीसाठी पात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा घेण्यासाठी काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे, अन्यथा... नवी दिल्ली : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकारकडून देशातील शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात येत आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी 1 डिसेंबर 2019 पासून आवश्यक माहिती गरजेची आहे. याशिवाय या योजनेच्या जुन्या पद्धतीतही सरकारने काही बदल केले आहेत.
आता पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ आता केवळ अशा शेतकऱ्यांना देण्यात येईल, ज्यांच्या नावावर शेती असेल. म्हणजे पूर्वीप्रमाणे वडिलोपार्जित जमीन असलेल्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
पंतप्रधान किसान सन्मान निधीसाठी पात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा घेण्यासाठी काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे, अन्यथा मिळणारा निधी अटकून राहील.
पंतप्रधान किसान सन्मान निधीसाठी अर्ज करतेवेळी आधार नंबर नसल्यामुळे किंवा चुकीचा आधार नंबर दिल्यामुळे या योजनेचा शेतकऱ्यांना लाभ मिळत नाही.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसाठी नवीन रजिस्ट्रेशन करणाऱ्या शेतकऱ्यांना आता अर्जाच्या फॉर्ममध्ये आपल्या जमिनीचा प्लॉट नंबर सुद्धा नमूद करावा लागतो. दरम्यान, हा नियम आधीचीच्या लाभार्थींना नसून नवीन नोंदणी करण्याऱ्या शेतकऱ्यांसाठी आहे.
केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, ज्यावेळी योग्य व प्रमाणित डेटा राज्य सरकारकडून केंद्राकडे पाठविला जातो, त्यावेळी पंतप्रधान किसान सन्मान निधी हा पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येतो.
अशा प्रकारे चूक दुरुस्त करू शकता शेतकरी स्वत: 'फार्मर्स कॉर्नर' वर जाऊन अर्जातील चूक दुरुस्त करू शकतात. कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) मध्येही पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या अर्जात सुधारणा केली जाऊ शकते.
पीएम किसान पोर्टलवर एक एक्सलूसिव्ह ‘फार्मर्स कॉर्नर’ देण्यात आला आहे. यावर, आधार कार्डवर असलेल्या नावानुसार शेतकरी आपले नाव देखील बदलू शकतात. बदल करण्यासाठी pmkisan.gov.in या वेबसाइटवर जाऊन फार्मर कॉर्नर (farmer corner) वर क्लिक करावे लागेल.
फार्मर कॉर्नरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आधार नंबर दुरुस्त करण्यासाठी इडिट आधार फेलिअर रिकॉर्ड (edit adhar failure record) दिसेल. त्यावर क्लिक करा. त्यानंतर याठिकाणी तुम्ही आपला स्वतःचा आधार नंबर अपडेट करू शकता.
अशा प्रकारे करू शकता रजिस्ट्रेशन तुम्हाला सर्वात आधी PM Kisan च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. त्यानंतर वेबसाइटवर Farmers Corner क्लिक करा. येथे तुम्हाला 'New Farmer Registration' चा दिसेल. त्यावर क्लिक करून आधार नंबर अपडेट करावा लागेल.
यासोबतच कॅप्चा कोड सुद्धा टाईप करावा लागेल. त्यानंतर राज्य निवडून पुढे जावे लागले. या फॉर्ममध्ये आपली वैयक्तिक माहिती द्यावी लागेल. तसेच, बँक खात्यासंबंधी माहिती आणि शेतीसंबंधी माहिती भरावी लागेल. यानंतर तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता.