आता PM किसान योजनेतील 6000 रुपयांच्या वार्षिक हप्त्यासह मिळवा 3000 रुपये मासिक पेन्शन, असा घ्या फायदा By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2021 10:11 PM 2021-06-30T22:11:02+5:30 2021-06-30T22:21:18+5:30
विशेष म्हणजे, आपण पीएम किसानचे अकाउंट होल्डर असाल, तर आपल्याला कुठल्याही प्रकारच्या कागदी प्रक्रियेची आवश्यकता नाही. आपले रजिस्ट्रेशन थेट पीएम किसान मानधन योजनेत होऊ शकते. तर जाणून घेऊ या योजनेचे फीचर्स आणि फायदे... (PM Kisan Yojana customers can take benefits of pm kisan maan dhan pension scheme) पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan) योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ऑगस्ट महिन्यापासून नववा हप्ता पाठविला जाईल. या योजनेंतर्गत 2,000 रुपयांचे तीन हप्ते, म्हणजेच 6000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात. याशिवाय, शेतकऱ्यांसाठी पेन्शनची सुविधा असलेली पीएम किसान मानधन योजनाही आहे (PM kisan maandhan pension scheme).
विशेष म्हणजे, आपण पीएम किसानचे अकाउंट होल्डर असाल, तर आपल्याला कुठल्याही प्रकारच्या कागदी प्रक्रियेची आवश्यकता नाही. आपले रजिस्ट्रेशन थेट पीएम किसान मानधन योजनेत होऊ शकते. तर जाणून घेऊ या योजनेचे फीचर्स आणि फायदे...
अशी आहे पीएम किसान मानधन योजना - पीएम किसान मानधन योजनेच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, या योजनेंतर्गत वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर पेन्शनची तरतूद आहे. या योजनेत 18 वर्षांपासून ते 40 वर्षांपर्यंत वय असलेल्या कुठल्याही शेतकऱ्याला गुंतवणूक करता येते. या योजनेंतर्गत शेतकऱ्याला 5000 रुपयांपर्यंत मासिक पेन्शन मिळू शकते.
मिळेल गॅरंटेड पेन्शन - या योजनेतील रजिस्टर्ड शेतकऱ्याला वयानुसार, मासिक गुंतवणूक केल्यास वयाच्या 60 वर्षांनंतर किमान 3000 रुपयांची मासिक अथवा 36,000 रुपये वार्षिक गॅरंटेड पेन्शन मिळते.
यासाठी 55 रुपयांपासूनते 200 रुपयांपर्यंत मासिक गुंतवणूक केली जाऊ शकते. पीएम किसान मानधन योजनेत फॅमिली पेन्शनचीही तरतूद करण्यात आली आहे. खातेदाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या जोडीदाराला 50 टक्के पेन्शन मिळेल. फॅमिली पेन्शनमध्ये केवळ पती/पत्नी यांचाच समावेश आहे.
PM Kisan लाभार्थ्यांना होणार असा फायदा - पीएम किसान योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना सरकार दरवर्षी 2000 रुपयां प्रमाणे 3 हप्ते, म्हणजेच 6000 रुपयांची आर्थिक मदत देते. हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात. या योजनेतील खातेधारकांनी पीएम किसान मानधन या पेन्शन योजनेत भाग घेतल्यास त्यांचे सहजपणे रजिस्ट्रेशन होईल.
या रजिस्ट्रेशनबरोबरच शेतकऱ्याने पर्याय निवडल्यास, या पेन्शन योजनेत दर महिन्याला द्यावे लागणारे काँट्रीब्यूशनही याच तीन हप्त्यांत मिळणाऱ्या पैशांतून कटू शकते. म्हणजेच यासाठी पीएम किसान खातेधारकाच्या खिशावरही ताण येणार नाही.
किती पैसे भरावे लागतील? - पीएम किसान मानधन पेन्शन योजनेत आपल्याला कीमान 55 रुपये आणि जास्तीत जास्त 200 रुपये महिन्याला भरावे लागतील. या प्रकारे एका वर्षात आपल्याला जास्तीत जास्त 2400 रुपये आणि कमीत कमी 660 रुपये भरावे लागतील.
अर्थात आपल्याला पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या माध्यमाने वर्षाला मिळणाऱ्या 6 हजार रुपयांपैकी, जास्तीत जास्त 2400 रुपये जरी पीएम किसान मानधन पेन्शन योजनेसाठी कटले, तरीही सन्मान निधीचे 3600 रुपये आपल्या अकाउंटवर शिल्लक राहतात...
...याच बरोबर, वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानतंर आपल्याला 3 हजार रुपये मासिक पेन्शनही मिळायला सुरुवात होते. याच बरोबर वर्षाला 2000 रुपयांचे 3 हप्तेही येत राहतील.