PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसान योजनेच्या 13 व्या हप्त्याची लिस्ट जारी, लवकर मिळणार 2 हजार रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2023 04:43 PM2023-02-04T16:43:23+5:302023-02-04T16:53:03+5:30

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेद्वारे पात्र शेतकऱ्यांना वर्षाकाठी 6 हजार रुपये दिले जातात.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि शेती व्यवसायाला चालना देण्यासाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. या योजनेद्वारे सरकारकडून शेतकऱ्यांना शेतीसाठी आर्थिक मदत दिली जाते.

पीएम किसान योजनेद्वारे पात्र शेतकऱ्यांना वर्षाकाठी 6 हजार रुपये दिले जातात. हे पैसे शेतकऱ्यांना 4 महिन्यांच्या अंतराने 3 हफ्त्यात दिले जातात. आतापर्यंत शेतकऱ्यांना 12 हफ्त्याचे पैसे देण्यात आले आहेत. मात्र, आता लवकरच सरकारकडून 13 वा हफ्ता शेतकऱ्यांना मिळणार आहे.

तुम्हीही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण सरकार या महिन्यामध्ये 13 वा हफ्ता शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर करणार आहे. या फेब्रुवारी महिन्यांमध्ये शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून पीएम किसान योजनेचे 2 हजारे रुपये देण्यात येणार आहेत.

केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी 2015 साली पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा फायदा देशातील लाखो अल्पभूधारक शेतकऱ्यांना होत आहे

पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये मिळतात. सरकारकडून ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ऑनलाइन ट्रान्सफर करण्यात येते.

केंद्र सरकारकडून या योजनेत लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची पात्रता तपासणी केली जात आहे. कारण या योजनेचा लाभ अनेक अपात्र शेतकऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून कठोर पाऊले उचलली जात आहेत.

पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत, लाभार्थी शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी थेट त्यांच्या बँक खात्यात एका आर्थिक वर्षात 2000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये 6,000 रुपयांची रक्कम ट्रान्सफर केली जाते. पहिला हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै, दुसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च या कालावधीत दिला जातो.

शेतकऱ्यांना पहिल्यांदा पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर जावे लागेल आणि होम पेजवर फार्मर कॉर्नरवर जावे लागेल. फार्मर कॉर्नरमध्ये लाभार्थी लिस्टच्या लिंकवर क्लिक करा. या प्रक्रियेनंतर राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गावाची माहिती द्यावी लागेल. सर्व माहिती भरल्यानंतर तुम्ही Get Report वर क्लिक करताच संपूर्ण लिस्ट येईल.