'अदानीं’वरून PM मोदी 'टार्गेट'; भेटूया, मुकेश अंबानींचा 'राईट हँड' असलेल्या 'मोदीं'ना, आहेत रिलायन्सचे 'चाणक्य' By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2023 02:27 PM 2023-02-09T14:27:26+5:30 2023-02-09T14:39:54+5:30
रिलायन्स इंडस्ट्रीज हे देशातील सर्वात मोठ्या व्यावसायिक घराण्यांपैकी एक आहे. या ग्रुपमध्ये एक अशी व्यक्ती देखील आहे, ज्याचा रिलायन्सचा प्रत्येक मोठा प्रकल्प यशस्वी करण्यात महत्त्वाचा वाटा आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज हे देशातील सर्वात मोठ्या व्यावसायिक घराण्यांपैकी एक आहे. जेव्हा आपण रिलायन्स समूहातील सर्वात शक्तिशाली लोकांबद्दल बोलतो तेव्हा अंबानी कुटुंबातील लोकांची नावे लक्षात येतात. मुकेश अंबानी, नीता अंबानी, आकाश अंबानी, ईशा अंबानी आणि अनंत अंबानी. हे लोक रिलायन्स ग्रुपच्या मोठ्या उद्योगांचे नेतृत्व करतात.
पण या ग्रुपमध्ये एक अशी व्यक्ती देखील आहे, ज्याचा रिलायन्सचा प्रत्येक मोठा प्रकल्प यशस्वी करण्यात महत्त्वाचा वाटा आहे. यांचं नाव आहे मनोज मोदी. मनोज मोदींना व्यापारी जगतातील लोक मुकेश अंबानींचा उजवा हात देखील म्हणतात. ते मुकेश अंबानी यांचे वर्गमित्र होते. अंबानी यांनी त्यांच्या नातेवाईकांना आणि मित्रांना ग्रुपमध्ये महत्त्वाच्या पदांवर ठेवले आहे.
मनोज मोदी अशी व्यक्ती आहे ज्यांना देशात आणि देशाबाहेर फार कमी लोक ओळखतात. बातम्यांमध्येही त्यांचे नाव तुम्हाला क्वचितच दिसेल. पण ते रिलायन्स ग्रुपच्या सर्वात शक्तिशाली लोकांमध्ये येतात. रिलायन्स समूहाच्या प्रमुख निर्णयांमागे त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. उद्योग जगतातील लोक त्यांना मुकेश अंबानींचा उजवा हात मानतात. त्यांना एमएम म्हणूनही ओळखले जाते.
मनोज मोदी यांच्याकडे दीर्घ काळ कोणतेही पद नव्हते. पण त्यांच्याकडे असलेली ताकद प्रत्येक पदापेक्षा मोठी आहे. बराच काळ ते अधिकृतपणे कोणत्याही व्यवसायाचे प्रमुख नव्हते. पण रिलायन्स ग्रुपच्या प्रत्येक मोठ्या निर्णयांमध्ये त्यांची भूमिका असते. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडकडे नियुक्त सीईओ नाही. पण या पदाच्या बरोबरीने पॉवर असलेली व्यक्ती म्हणजे मनोज मोदी. मनोज मोदी सध्या रिलायन्स रिटेल आणि रिलायन्स जिओचे संचालक आहेत.
मनोज मोदी हे मुकेश अंबानी यांच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील वर्गमित्र आहेत. दोघेही कॉलेजच्या काळापासूनचे मित्र. दोघांनी मुंबई विद्यापीठात एकत्र इंजिनीअरिंग केले. दोघांनी केमिकल इंजिनीअरिंगमध्ये बॅचलर डिग्री घेतली आहे.
मनोज मोदी 1980 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजशी संबंधित होते. त्यांनी अंबानी कुटुंबातील तीन पिढ्यांसह काम केले आहे. मनोज मोदी यांनी धीरूभाई अंबानींनंतर मुकेश अंबानींसोबत आणि आता ईशा, आकाश आणि अनंत अंबानींसोबत काम केलं आहे.
2007 मध्ये मनोज मोदी यांना संचालकपद देण्यात आले. हजिरा पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स, जामनगर रिफायनरी, फर्स्ट टेलिकॉम बिझनेस, रिलायन्स रिटेल आणि 4जी रोलआउट यांसारख्या रिलायन्सच्या अनेक मोठ्या प्रकल्पांशी ते संबंधित आहेत.
मुकेश अंबानी यांनी त्यांचा उजवा हात असलेल्या मनोज मोदींना गेल्या वर्षी शानदार गिफ्ट दिले होते. गेल्या अनेक वर्षांपासून मोदी अंबानींसाठी काम करत आहेत. त्यांच्या प्रामाणिकपणाचं फळ म्हणून अंबानींनी त्यांना एक आलिशान इमारत गिफ्ट केली होती.
अंबानींनी मोदींना 22 मजल्यांची इमारत गिफ्ट दिली होती. मुंबईतल्या नेपियन सी या महागड्या भागात ही इमारत उभी आहे. तिची किंमत जवळपास 1500 कोटी रुपये इतकी असून या इमारतीचे नाव क्रिस्टेनेड वृंदावन आहे. आरआयएलच्या जडणघडणीत मोदींचे योगदान मोठे आहे. त्यांच्या याच कामगिरीबद्दल त्यांचं कौतुक म्हणून अंबानींनी मनोज मोदींना महागडं घर गिफ्ट केले होते.