Business Idea: PM मोदींनीही दिली आहे आयडीया! फक्त 20 हजारात सुरू करा हा खास बिझनेस, महिन्याला होईल 4 लाखांची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2022 02:12 PM2022-12-07T14:12:40+5:302022-12-07T14:23:14+5:30

महत्वाचे म्हणजे, पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी आपल्या 'मन की बात' कार्यक्रमाच्या 67व्या भागात यासंदर्भात भाष्य केले होते.

जर आपली छोटी गुंतवणूक करून व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असेल, तर ही बातमी नक्की वाचा. आपण केवळ 20,000 रुपयांची गुंतवणूक करून स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता. हा व्यवसाय म्हणजे 'लेमन ग्रास' (Lemon Grass). आपण लेमन ग्रासची लागवड करून मोठ्या प्रमाणावर नफा मिळवू शकता. यासाठी आपल्याला फारशी गुंतवणूकही करावी लागणार नाही. तर चाणून घेऊयात या जबरदस्त बिझनेस संदर्भात...

महत्वाचे म्हणजे, पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी आपल्या 'मन की बात' कार्यक्रमाच्या 67व्या भागात यासंदर्भात भाष्य केले होते. यावेळी, या विशेष वनस्पतीची शेती करून शेतकरी बंधू स्वतः सशक्त होऊन, देशाच्या विकासातही आपले मोठे योगदान देऊ शकतात, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले होते.

आपण ही शेती करायची पद्धत जाणऊन घेतली तर, आपल्याला या शेतीतून जबरदस्त नफा मिळू शकेल. महत्वाचे म्हणजे, आसाठी आपल्याला केवळ 15 ते 20 हजार रुपयांपर्यंतच खर्च करावा लागेल. अर्थात, यासाठी आपण केवळ एकदाच 20 हजार रुपयांची गुंतवणूक करून त्यावर दर महिन्याला लाखो रुपयांची कमाई करू शकता.

बाजारात लेमन ग्रासला मोठी मागणी आहे. याच्या (लेमन ग्रास ऑइल) तेलाचा वापर सौंदर्यप्रसाधने, साबण, तेल आणि औषधांमध्ये केला जातो. यामुळे या वस्तू बनवणाऱ्या कंपन्यांनाही याची गरज असते. एवढेच नाही, तर या ग्रासच्या लागवडीचे इतरही अनेक फायदे आहेत.

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, आपण दुष्काळग्रस्त भागातही लेमन ग्रासची लागवड करू शखता. आपल्याला आश्चर्य वाटेल, पण आपण, केवळ एक हेक्टरमध्ये लेमन ग्रासची लागवड करून वर्षाला 4 लाख रुपयांपर्यंत नफा कमवू शकतात.

लेमन ग्रासच्या लागवडीसंदर्भात बोलायचे झाल्यास, फेब्रुवारी ते जुलै हा या ग्रासच्या लागवडीसाठीचा सर्वोत्तम काळ आहे. महत्वाचे म्हणजे एकदा याची लागवड झाल्यानंतर सहा ते सात वेळा याची कापणी केली जाऊ शकते. याच बरोबर वर्षाच्या उत्पादनासंदर्भात बोलायचे झाल्यास, आपण वर्षातून तीन ते चार वेळा याची कापणी करू शकतो.

लेमन ग्रासच्या बिझनेसमध्ये एका वर्षात सुमारे 3 ते 5 लिटर तेल जमिनीच्या एका तुकड्यातून मिळू शकते. या तेलाची किंमत बाजारात 1,000 ते 1,500 रुपये लिटर एवढी आहे. यावरूनच आपल्याला याच्या नफ्याचा अंदाज येईल. या बिझनेससाठी लागणाऱ्या जमिनीच्या क्षेत्रफळासंदर्भात बोलायचे झाल्यास, एक एकरवरील पिकापासून आपण जवळपास 5 टन पाने मिळवू शकतो.

लेमन ग्रासमधून होणाऱ्या नफ्यासंदर्भात बोलायचे झाल्यास, पाच टन लेमन ग्रासपासून आपण किमान ३ लाख रुपयांची कमाई करू शकता. एवढेच नाही, तर आपण लेमन ग्रासची पाने विकूनही मोठा नफा मिळवू शकता.