Post Office FD Vs MSSC: जितकं व्याज ५ वर्षांच्या एफडीवर मिळतं; तितकं महिलांना या स्कीममध्ये २ वर्षांत मिळतं, जाणून घ्या By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 09:25 AM 2024-04-22T09:25:53+5:30 2024-04-22T09:36:08+5:30
Post Office FD Vs MSSC: बँकांप्रमाणे पोस्ट ऑफिसमध्येही अनेक प्रकारच्या योजना चालवल्या जातात आणि या योजनांवर चांगलं व्याज मिळतं. या स्कीममध्ये महिलांना गुंतवणुकीवर मिळतंय उत्तम व्याज. Post Office FD Vs MSSC: बँकांप्रमाणे पोस्ट ऑफिसमध्येही अनेक प्रकारच्या योजना चालवल्या जातात आणि या योजनांवर चांगलं व्याज मिळतं. तसंच, तुमच्या गुंतवलेल्या रकमेवर कोणत्याही प्रकारची जोखीम नसते. तुम्हाला तुमच्या पोर्टफोलिओमध्ये कोणत्याची फिक्स्ड डिपॉझिट स्कीमचा समावेश करायचा असेल तर तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये अशा अनेक स्कीम्स मिळतील.
पोस्ट ऑफिस एफडी त्यापैकी एक आहे. येथे तुम्हाला १,२,३ आणि ५ वर्षांच्या एफडीचा पर्याय मिळेल. ५ वर्षांच्या एफडीवर सर्वाधिक व्याजदर आहे. यावर ७.५ टक्के दरानं व्याज मिळतं.
महिलांना पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर त्यांच्यासाठी खास योजनाही उपलब्ध आहे. आम्ही महिला सन्मान बचत प्रमाणपत्र (Mahila Samman Saving Certificate-MSSC) बद्दल सांगत आहोत. या योजनेत महिलांना फक्त 2 वर्षांसाठी गुंतवणूक करायची आहे आणि त्यांना फक्त 7.5 टक्के दराने व्याज दिलं जातं.
म्हणजेच महिलांना फक्त दोन वर्षांच्या या योजनेवर 5 वर्षांच्या एफडीवर जेवढं व्याज मिळत आहे तेवढेच व्याजदरही मिळणार आहेत. अशा परिस्थितीत त्यांना जास्त काळ पैसे जमा करावे लागणार नाहीत. महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेटचे फायदे आता जाणून घेऊ.
महिला सन्मान बचत योजनेअंतर्गत कोणतीही महिला तिचं खातं उघडू शकते. १८ वर्षांखालील मुलींसाठी, त्यांचे पालक हे खातं उघडू शकतात. म्हणजेच प्रत्येक वयोगटातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात, ही योजना महिलांना बचत करण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी आहे. या योजनेत महिलांना चक्रवाढ व्याजाचा लाभ ७.५ टक्के दरानं मिळतो आणि व्याजाची गणना तिमाही आधारावर केली जाते. अशा परिस्थितीत या योजनेच्या माध्यमातून महिलांना जमा केलेल्या रकमेवर चांगला नफा मिळतो.
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना कॅल्क्युलेटरनुसार, जर महिलांनी या योजनेत ५० हजार रुपये गुंतवले तर त्यांना दोन वर्षांत ८०११ रुपयांचं व्याज मिळेल आणि अशा प्रकारे एकूण मॅच्युरिटीवर ५८,०११ रुपये मिळतील. तुम्ही १,००,००० रुपये गुंतवल्यास, तुम्हाला ७.५ टक्के व्याजदरानं १,१६,०२२ रुपये मॅच्युरिटीच्या वेळी मिळतील.
जर तुम्ही १,५०,००० रुपये जमा केले तर तुम्हाला दोन वर्षांनी १,७४,०३३ रुपये मिळतील म्हणजेच २४,०३३ रुपयांचं तुम्हाला व्याज मिळेल आणि जर तुम्ही या योजनेत २,००,००० रुपये गुंतवले तर तुम्हाला दोन वर्षानंतर गुंतवलेल्या रकमेवर ७.५ टक्के व्याजानुसार ३२,०४४ रुपये व्याज म्हणून मिळतील. अशा प्रकारे तुम्हाला मॅच्युरिटीवर २,३२,०४४ रुपये मिळतील.
ही योजना दोन वर्षात मॅच्युअर होते. दोन वर्षांनी तुमची रक्कम व्याजासह परत मिळते. परंतु तुम्हाला यादरम्यान पैशांची गरज असल्यास, एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर, तुम्ही जमा केलेल्या रकमेच्या ४० टक्के रक्कम काढू शकता. म्हणजेच तुम्ही २ लाख रुपये जमा केले असतील तर एक वर्षानंतर तुम्ही ८० हजार रुपये काढू शकता.
MSSC खाते उघडण्यासाठी, तुम्हाला जवळच्या पोस्ट ऑफिसच्या शाखेत जावं लागेल. येथे तुम्हाला खाते उघडण्याचा फॉर्म-१ भरावा लागेल. तसंच, आधार कार्ड आणि पॅन कार्ड यांसारख्या केवायसी कागदपत्रांची झेरॉक्स आणि इतर महत्त्वाच्या कागदपत्रांची झेरॉक्स द्यावी लागेल.