Post Office नं आणली आहे जबरदस्त योजना, मिळेल 50 लाखांचा फायदा; असा करा अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 05:36 PM2023-02-27T17:36:14+5:302023-02-27T17:42:37+5:30

आज आम्ही आपल्याला अशाच एका योजनेसंदर्भात माहिती देणार आहोत. ज्या योजनेच्या माध्यमाने आपण आपले पैसे दुप्पट करू शकतात.

पोस्ट ऑफिसच्या योजनांकडे अनेक जण आकर्षित होतात. अनेक लोक पोस्टाच्या योजनांमध्ये पैसा गुंतवून चांगला नफाही कमावतात. मॅच्युरिटी पूर्ण झाल्यानंतर त्यांना चांगला परतावाही मिळतो. यामुळे लोकांचा या योजनांवर अधिक विश्वास आहे.

आपल्याला पोस्ट ऑफिसमध्ये जीवन विम्याचीही सुविधा मिळते. आज आम्ही आपल्याला अशाच एका योजनेसंदर्भात माहिती देणार आहोत. ज्या योजनेच्या माध्यमाने आपण आपले पैसे दुप्पट करू शकतात.

काय आहे या योजनेचं नाव? - या योजनेचे नाव आहे, पोस्टल जीवन विमा (Postal Life Insurance) योजना. या योजनेत गुंतवणूक करून आपण आपला पैसा दुप्पट करू शकता. ही सर्वात जुणी विमा योजना आहे. तर यासाठी आपण कशा पद्धतीने अप्लाय करू शकता हे जाणून घेऊयात...

50 लाख रुपयांपर्यंतची सुविधा - या योजनेत पॉलिसीधारकांला 50 लाख रुपयांपर्यंतची सुविधा मिळते. यात 19 वर्षांपासून ते 55 वर्षांपर्यंतच्या लोकांना गुंतवणूक करता येते. यात आपल्याला बोनसही मिळतो. याच बरोबर किमान 20,000 रुपये आणि जास्तीत जास्त 50 लाख रुपये एवढा सम एश्योर्डचा फायदाही मिळतो. तसेच ही योजना सुरू असतानाच पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास संपूर्ण पैसे नॉमिनीला दिले जातात.

मिळते लोनची सुविधा - पॉलिसीधारकाने सलग 4 वर्षांपर्यंत पॉलिसी ठेवल्यास, पॉलिसीधारकाला लोनची सुविधाही दिली जाते. तसेच पॉलिसी बंद करायची असेल तर 3 वर्षांनंतर आपण ती बंदही करू शकता. मात्र आपण 5 वर्षांच्या आत पॉलिसी बंद केली तर आपल्याला बोनसचा लाभ मिळत नाही.

जाणून घ्या कुणाला मिळतो लाभ? या पॉलिसीचा लाभ वयाच्या 80 व्या वर्षी मिळतो. कारण एश्योर्ड अमाउंट विम्याची सुविधा आपल्याला 80 व्या वर्षीच मिळते.

असा करा अर्ज - आपण जीवन विम्याच्या लिंकवर जाऊन अर्ज करू शकता. (https://pli.indiapost.gov.in) अर्ज करू शकता. यानंतर, पॉलिसीदरम्यान पॉलिसीहोल्डरचा मृत्यू झाल्यास संपूर्ण पैसे नॉमिनीला मिळतात.