पैसे दुप्पट करणारी 'पोस्ट ऑफीस'ची जबरदस्त स्कीम, १ हजार रुपयांपासून करा सुरुवात! जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2022 15:33 IST2022-11-20T15:25:43+5:302022-11-20T15:33:36+5:30

पोस्ट ऑफीसच्या स्कीममध्ये गुंतवणूक करुन गुंतवणूकदारांना उत्तम परताव्यासह सुरक्षित गुंतवणुकीचीही हमी प्राप्त होते. त्यामुळे पोस्ट ऑफीसच्या स्कीमकडे अनेकांचा कल असतो. पोस्ट खात्यातून अनेक स्मॉल सेव्हींग स्कीम देखील चालवल्या जातात.
यातीलच एक योजना म्हणजे किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra) पोस्टाची ही योजना देखील अत्यंत लोकप्रिय आहे. नुकतंच सरकारनं या स्कीम अंतर्गत मिळणाऱ्या व्याजात वाढ केली आहे. तुम्ही जर गुंतवणुकीचा पर्याय शोधत असाल तर ही स्कीम नक्कीच उपयोगी ठरू शकते.
व्याज किती
किसान विकास पत्र या योजनेत लोक आपले पैसे दुप्पट करण्याच्या उद्देशानं गुंतवणूक करतात. पैसे दुप्पट होण्यासाठी ही लोकप्रिय योजना समजली जाते. नुकतंच सरकारनं या स्कीममध्ये पैसे डबल होण्याचा निर्धारित कालावधी देखील कमी केला आहे. किसान विकास पत्र स्कीमममध्ये याआधी ६.९ टक्के व्याज मिळता होता. आता यात वाढ करून ७ टक्के इतकं करण्यात आलं आहे. आता जर तुम्ही या स्कीम अंतर्गत गुंतवणूक करणार असाल तर तुम्हाला नव्या व्याज दरानुसार लाभ घेता येणार आहे.
किती कालावधीत दुप्पट होतात पैसे?
किसान विकास पत्र योजनेअंतर्गत किमान १ हजार रुपये आणि कमाल पातळीवर तुमच्या इच्छेनुसार पैसे गंतवू शकता. वयवर्ष १८ किंवा त्यापेक्षा अधिक वयोगटातील कोणताही भारतीय नागरीक या स्कीममध्ये गुंतवणूक करू शकतो. जवळच्या पोस्ट ऑफीस कार्यालयात जाऊन या स्कीममध्ये गुंतवणूक करता येईल.
किसान विकास पत्रमध्ये गुंतवणूकदारांची रक्कम याआधी १२४ महिन्यात डबल होत होती. पण आता याच्या कालावधीत बदल झाला असून एक महिन्याने कमी म्हणजे १२३ महिने इतका झाला आहे. म्हणजेच गुंतवणूकदारानं गुंतवणलेली रक्कम १० वर्ष आणि तीन महिन्यात डबल होणार आहे. हा नवा बदल १ ऑक्टोबरबासून लागू झाला आहे.
जॉइंट अकाऊंट उगडण्याचीही मूभा
देशातील कोणत्याही पोस्ट ऑफीसमध्ये जाऊन तुम्ही किसान विकास पत्र योजनेत गुंतवणूक करू शकता. पोस्ट ऑफीसमध्ये या स्कीमसाठी १० वर्षापेक्षा खालील मुला-मुलीच्या जागी स्वत:च्या नावे खातं सुरू करू शकता.
ज्या दिवशी अल्पवयीन खातेधारकाचं वय १० वर्ष झालं की खातं त्याच्या नावावर ट्रान्सफर केलं जाईल. किसान विकास पत्रमध्ये एकाच वेळी १८ वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वयोगटाचे तीन लोक जॉइंट अकाऊंत सुरू करू शकतात.
रिटर्न्सवर भरावा लागतो कर
किसान विकास पत्र स्कीम १२३ महिन्यात मॅच्युअर होते. जर एकाद्यानं स्कीम घेतल्याच्या एका वर्षाच्या आत परत केली किंवा थांबवली तर त्याला कोणत्याही पद्धतीचे लाभ मिळणार नाहीत.
पोस्ट ऑफीसची ही योजना इन्कम टॅक्स अधिनियम 80C अंतर्गत येत नाही. त्यामुळे किसान विकास पत्र योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना मिळणाऱ्या रिटर्न्सवर तुम्हाला कर भरावा लागतो. पण या स्कीममध्ये टीडीएस कापला जात नाही.
कसं सुरू कराल खातं?
किसान विकास पत्र योजना सुरू करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी पोस्ट ऑफीसमध्ये जावं लागेल. यानंतर तिथं एक अर्ज दाखल करावा लागतो आणि गुंतवणूकीची रक्कम किंवा धनादेश जमा करावा लागेल. अर्जासोबतच तुम्हाला तुमचं ओळखपत्र द्यावं लागेल. अर्ज आणि पैसे जमा केल्यानंतर तुम्हाला तुमचं किसान विकास पत्र सर्टिफिकेट दिलं जाईल.