तीन वर्षाच्या एफडी स्कीमवर पोस्ट ऑफिस की SBI कुठे जास्त व्याज? जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2024 08:20 PM2024-01-07T20:20:35+5:302024-01-07T20:29:15+5:30

एफडीवर बँक जास्त व्याज देते की पोस्ट ऑफिस.

पोस्ट ऑफिस टर्म डिपॉझिट स्कीम किंवा SBI ची कोणती FD स्कीम तुम्हाला तीन वर्षांत अधिक फायदे देते? जाणून घ्या सविस्तर

जर तुम्ही पोस्ट ऑफिस टर्म डिपॉझिट स्कीम आणि SBI च्या FD स्कीम (3 वर्षे) मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुम्हाला सांगतो तुम्हाला कुठे जास्त परतावा मिळतो.

सरकारने नुकतेच पोस्ट ऑफिस मुदत ठेव योजनेच्या व्याजदरात १० आधार अंकांची वाढ केली आहे. अशा स्थितीत तीन वर्षांच्या कालावधीत ७ टक्क्यांऐवजी ७.१० टक्के व्याजाचा लाभ मिळतो.

पोस्ट ऑफिसचे नवीन दर १ जानेवारी २०२४ ते ३१ मार्च २०२४ पर्यंत लागू करण्यात आले आहेत.

स्टेट बँकेने २७ डिसेंबर २०२३ रोजी त्यांच्या २ कोटी रुपयांपेक्षा कमी FD योजनेवरील व्याजदरात वाढ जाहीर केली आहे. बँकेने वेगवेगळ्या कालावधीच्या एफडीवरील दरात २५ बेसिस पॉइंट्सने वाढ केली आहे.

बँक ३ ते ५ वर्षांच्या कालावधीसाठी FD वर ६.७५ टक्के व्याजदर देत आहे. हे दर सर्वसामान्य नागरिकांना देण्यात येत आहेत.

पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेव योजनेवर ग्राहकांना जास्त व्याजदराचा लाभ मिळत आहे.