बँकांपेक्षा पोस्ट ऑफिसच्या योजना फायद्याच्या! FD वरुन अधिक परताव्यासाठी या स्किम्स पाहा By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 12:02 PM 2024-07-10T12:02:13+5:30 2024-07-10T12:14:02+5:30
Post Office Savings Schemes : आपल्याकडे अनेकजण बचतीसाठी योजनांमध्ये पैसे गुंतवतात. सध्या पोस्ट ऑफिस बँकांपेक्षा चांगला परतावा देत आहेत. Post Office Savings Schemes : बचतीसाठी आपल्याकडे अनेकजण वेगवेगळ्या योजनांमध्ये पैसे गुंतवले जातात. बँकांमध्ये एफडी वरती गुंतवणूक करण्याचा अनेकांचा भर असतो.
पोस्ट ऑफिसही बचतीसाठी योजना देत असते. स्मॉल सेव्हींगमध्ये पोस्ट ऑफिस सर्वात पुढे आहे. या योजना बँक एफडीपेक्षा जास्त व्याजदर देतात.
पोस्ट ऑफिस स्कीममध्ये जास्त व्याजासह कोणताही धोका नाही. जर गुंतवणूकदाराला जोखीम न घेता गुंतवणूक करायची असेल तर तो या योजनांमध्ये गुंतवणूक करू शकतो. पोस्ट ऑफिस योजनांची खास गोष्ट म्हणजे व्याज दर प्रत्येक तिमाहीत बदलतात.
पोस्ट ऑफिसच्या अशा अनेक योजना आहेत, या योजना तुम्हाला बँक एफडीपेक्षाही जास्त व्याजदर देतात.
पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना देत आहे. या योजनेचे नावच ज्येष्ठ नागरिक योजना असं आहे. ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. ६० वर्षांवरील व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेत गुंतवणूकदाराला एकरकमी गुंतवणूक करावी लागते आणि जास्तीत जास्त ३० लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत SCSS मध्ये कर लाभ देखील उपलब्ध आहे.
या योजनेत व्याजदर- ८.२ टक्के देत आहे. याचा मॅच्युरिटी कालावधी ५ वर्षे आहे. ते ५ वर्षांनी आणखी वाढवता येईल.
पोस्ट ऑफिसची 'किसान विकास पत्र' नावाची एक योजना आहे. यामध्ये हमी परतावा मिळतो. या योजनेत गुंतवणूकदाराला कर लाभ मिळत नाहीत. या योजनेत गुंतवणुकीसाठी कमाल मर्यादा नाही. व्याज दर ७.५ टक्के वार्षिक चक्रवाढ आहे. याचा कालावधी ११५ महिने म्हणजेच ९ वर्षे ७ महिने आहे.
पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीममध्ये, किमान १५०० रुपये आणि कमाल ९ लाख वार्षिक गुंतवणूक करावी लागते. या योजनेत गुंतवणुकीच्या रकमेवर मिळणाऱ्या उत्पन्नावर कर आहे. या योजनेवर दरमहा व्याज दिले जाते.यार वार्षित ७.४ टक्के व्याज मिळत आहे. याचा कालावधी ५ वर्षे आहे.
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये हमी परतावा उपलब्ध आहे. या योजनेत मिळणारे व्याज मुदतपूर्तीच्यावेळी दिले जाते. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रांमध्ये किमान १००० रुपयांची गुंतवणूक करावी लागेल आणि कमाल गुंतवणुकीला मर्यादा नाही. या योजनेतही गुंतवणूकदाराला कर सवलतीचा लाभ मिळतो. याचे ७.७ टक्के चक्रवाढ वार्षिक व्याज दर आहे, याचा कालावधी ५ वर्षांचा आहे.
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये हमी परतावा उपलब्ध आहे. या योजनेत मिळणारे व्याज मुदतपूर्तीच्यावेळी दिले जाते. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रांमध्ये किमान १००० रुपयांची गुंतवणूक करावी लागेल आणि कमाल गुंतवणुकीला मर्यादा नाही. या योजनेतही गुंतवणूकदाराला कर सवलतीचा लाभ मिळतो. याचे ७.७ टक्के चक्रवाढ वार्षिक व्याज दर आहे, याचा कालावधी ५ वर्षांचा आहे.
पोस्ट ऑफिसने सुरू केलेली 'महिला सन्मान बचत प्रमाणपत्र' ही योजना महिलांमध्ये खूप लोकप्रिय आहे. या योजनेत कर लाभ मिळत नाहीत. यावर ७.५ टक्के चक्रवाढ व्याज दर वार्षिक मिळते तर याचा कालावधी २ वर्षांचा आहे.