Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2024 09:12 AM 2024-05-03T09:12:45+5:30 2024-05-03T09:42:49+5:30
Post Office PPF Scheme: आपण कोट्यधीश व्हावं, आपल्याला पैशांची कमतरता भासू नये असं अनेकांना वाटत असतं. परंतु कोट्यधीश होण्याचं स्वप्न पूर्ण कसं करायचं? यावर मोजकेच लोक काम करतात. Post Office PPF Scheme: आपण कोट्यधीश व्हावं, आपल्याला पैशांची कमतरता भासू नये असं अनेकांना वाटत असतं. परंतु कोट्यधीश होण्याचं स्वप्न पूर्ण कसं करायचं? यावर मोजकेच लोक काम करतात. यासाठी गुंतवणूक ही अतिशय महत्त्वाची असते. योग्य ठिकाणी केलेली गुंतवणूक तुम्हाला मोठा परतावा मिळवून देऊ शकते.
जर तुम्ही पगारदार वर्गातील व्यक्ती असाल तर नोकरीच्या सुरुवातीपासूनच गुंतवणूक करणं योग्य ठरेल. तुम्ही जितका जास्त काळ गुंतवणूक कराल तितका चांगला परतावा मिळू शकेल. आज आम्ही तुम्हाला अशाच पोस्ट ऑफिसच्या स्कीमबद्दल सांगत आहोत जी तुम्हाला कोट्यधीश बनवू शकते.
जर तुम्ही पीपीएफ खात्यात दरमहा १२,५०० रुपये जमा केले आणि ते १५ वर्षांसाठी गुंतवले, म्हणजेच तुम्हाला दररोज ४१७ रुपयांची बचत करून गुंतवणूक करावी लागेल. यानंतर मॅच्युरिटीवर तुम्हाला एकूण ४०.६८ लाख रुपये मिळतील.
यामध्ये तुमची एकूण गुंतवणूक २२.५० लाख रुपये असेल, तर व्याजातून तुम्हाला मिळणारं उत्पन्न १८.१८ लाख रुपये असेल. पुढील १५ वर्षांसाठी ७.१ टक्के वार्षिक व्याजाच्या आधारे ही गणना करण्यात आली आहे. व्याजदर बदलल्यास मॅच्युरिटीवर मिळणारी रक्कम बदलू शकते. पीपीएफमध्ये कंपाउंडिंग तत्त्वावर व्याज दिलं जातं.
जर तुम्हाला या योजनेतून कोट्यधीश व्हायचं असेल तर तुम्हाला १५ वर्षांनंतर ५-५ वर्षांसाठी २ वेळा या योजनेचा कालावधी वाढवावा लागेल. म्हणजेच आता तुमच्या गुंतवणुकीचा कालावधी २५ वर्षांचा असेल. म्हणजेच २५ वर्षांनंतर तुम्हाला एकूण १.०३ कोटी रुपये मिळतील.
या कालावधीत तुमची एकूण गुंतवणूक ३७.५० लाख रुपये असेल, तर तुम्हाला व्याजाद्वारे ६५.५८ लाख रुपये मिळतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे, जर तुम्हाला पीपीएफ खातं वाढवायचं असेल तर तुम्हाला मॅच्युरिटीच्या एक वर्ष आधी अर्ज करावा लागेल. मॅच्युरिटीनंतर खात्याचा कालावधी वाढवता येणार नाही.
पीपीएफ योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आयकर कायद्याच्या कलम ८० सी अंतर्गत करसवलत मिळते. या योजनेत तुम्ही दीड लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर सूट घेऊ शकता. पीपीएफवर मिळणाऱ्या व्याजावरही कर लागत नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकार अल्पबचत योजनांना प्रोत्साहन देते. त्यामुळे त्यात गुंतवणूक करणं पूर्णपणे सुरक्षित आहे.