Post Office Investment : पोस्टाची 'ही' स्कीम तुम्हाला करेल मालामाल, केवळ ५ हजारांची गुंतवणूक; काही वर्षांत बनाल लखपती By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2024 09:44 AM 2024-11-30T09:44:07+5:30 2024-11-30T09:52:30+5:30
Post Office Investment : जर तुम्ही तुमच्या बचतीचे पैसे एखाद्या चांगल्या योजनेत गुंतवण्याचा विचार करत असाल, जिथून तुम्हाला चांगला परतावा मिळतो, तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. Post Office Investment : जर तुम्ही तुमच्या बचतीचे पैसे एखाद्या चांगल्या योजनेत गुंतवण्याचा विचार करत असाल, जिथून तुम्हाला चांगला परतावा मिळतो, तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या एका अतिशय उत्तम गुंतवणूक योजनेबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्ही फक्त ५ हजार रुपयांची गुंतवणूक करून काही वर्षात लखपती बनू शकता. पोस्ट ऑफिसच्या या योजनेचं नाव रिकरिंग डिपॉझिट स्कीम असं आहे.
या योजनेत तुम्ही दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवू शकता आणि काही वर्षांत ८ लाख रुपयांपेक्षा जास्त निधी जमा करू शकता. सध्या या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला ६.७ टक्के व्याज मिळत आहे. या योजनेचा मॅच्युरिटी पीरियड पाच वर्षांचा आहे. मात्र, पाच वर्षांच्या मॅच्युरिटी पिरियडनंतर तुम्ही तुमच्या गुंतवणुकीचा कालावधी आणखी पाच वर्षांसाठी वाढवू शकता.
आपण आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन रिकरिंग डिपॉझिट स्कीममध्ये आपलं खातं सहज उघडू शकता. या योजनेची खास गोष्ट म्हणजे तुम्ही १०० रुपयांपासून गुंतवणुकीची सुरुवात करू शकता.
त्याचबरोबर जास्तीत जास्त गुंतवणुकीच्या रकमेची मर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही. जर तुम्ही या योजनेत आपलं खातं उघडलं आणि पूर्ण पाच वर्षे दरमहा पाच हजार रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्ही गुंतवलेली रक्कम ३ लाख रुपये असेल.
तर, ६.७ टक्के व्याजदरानं हिशोब केल्यास तुम्हाला एकूण ५६,८३० रुपये व्याज म्हणून मिळतील. यामध्ये तुमच्याकडे एकूण ३,५६,८३० रुपये असतील.
यानंतर आणखी पाच वर्षे तुम्हाला अधिक गुंतवणूक करावी लागेल. अशावेळी तुम्ही गुंतवलेली रक्कम एकूण ६,००,००० रुपये असेल. तर तुम्हाला एकूण २,५४,२७२ रुपये व्याज म्हणून मिळतील. अशावेळी दहा वर्षांनंतर मॅच्युरिटीच्या वेळी तुमच्याकडे ८,५४,२७२ रुपये असतील.