Post Office Investment : Post Officeची 'ही' स्कीम सर्वसामान्यांना बनवू शकते करोडपती; केवळ वापरावी लागेल 'ही' छोटी ट्रिक By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 08:27 AM 2024-08-27T08:27:56+5:30 2024-08-27T08:57:43+5:30
Post Office Investment Scheme : आजकाल अनेक जण गुंतवणूकीकडे वळू लागलेत. जर तुम्हाला भविष्याच्या दृष्टीनं मोठा निधी जमा करायचा असेल तर गुंतवणूक करणं आवश्यक आहे. परंतु ही गुंतवणूक योग्य ठिकाणी करणंही तितकंच गरजेचं आहे. Post Office Investment Scheme : आजकाल अनेक जण गुंतवणूकीकडे वळू लागलेत. जर तुम्हाला भविष्याच्या दृष्टीनं मोठा निधी जमा करायचा असेल तर गुंतवणूक करणं आवश्यक आहे. परंतु ही गुंतवणूक योग्य ठिकाणी करणंही तितकंच गरजेचं आहे. जर तुम्ही कोट्यधीश होण्याचं स्वप्न पाहत असाल तर आम्ही तुम्हाला असा मार्ग सांगणार आहोत ज्यामुळे तुमचे स्वप्न अगदी सहजपणे प्रत्यक्षात साकार होऊ शकतं.
पण त्यासाठी शिस्तबद्ध गुंतवणुकीत थोडा संयम ठेवावा लागेल, कारण असं काम एका दिवसात होत नाही. सामान्य माणसाला गुंतवणूक करताना सर्वात मोठी जोखीम म्हणजे त्याचे गुंतवलेले पैसे गमावले जाणार नाहीत. पण आम्ही तुम्हाला जी पोस्ट ऑफिस योजना सांगत आहोत ती सरकारी गॅरंटेड स्कीम आहे, म्हणजे त्यात तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित राहतील.
आम्ही पब्लिक प्रॉव्हिडंट फंड अर्थात पीपीएफबद्दल सांगत आहोत. १५ वर्षांचा कार्यकाळ असलेली ही योजना प्रत्येक सामान्य माणसाला कोट्यधीस बनवू शकते. यासाठी फक्त एका छोट्या ट्रिकचा वापर करावा लागेल. पीपीएफ कोणत्याही व्यक्तीला करोडपती कसं बनवू शकतो, जाणून घेऊ.
पीपीएफमध्ये कोणतीही व्यक्ती वर्षाला जास्तीत जास्त दीड लाख रुपये जमा करू शकते आणि मिनिमम डिपॉझिट लिमिट ५०० रुपये आहे. या योजनेवर सध्या ७.१ टक्के व्याज मिळत आहे. आता करोडपती होण्यासाठी तुम्हाला या योजनेत वर्षाला दीड लाख रुपये जमा करावे लागतील. ही योजना १५ वर्षांत मॅच्युअर होत असली तरी ५-५ वर्षांच्या ब्लॉकमध्येही ती वाढवता येते.
आपल्याला एकच युक्ती वापरावी लागेल ती म्हणजे ५-५ वर्षांच्या ब्लॉकमध्ये कमीतकमी दोनदा योगदानासह आपलं पीपीएफ खातं एक्सटेंड करणं. म्हणजेच तुम्हाला किमान २५ वर्षांसाठी वार्षिक दीड लाख रुपये (महिन्याला १२,५०० रुपये) जमा करावे लागतील.
असं केल्यास २५ वर्षात तुम्ही एकूण ३७,५०,००० रुपयांची गुंतवणूक कराल. ७.१ टक्के व्याजदरानुसार तुम्हाला ६५,५८,०१५ रुपये व्याज म्हणून मिळणार आहेत. अशा प्रकारे तुमची गुंतवणूक आणि त्यावर मिळणारी व्याजाची रक्कम मिळून २५ वर्षांनंतर तुम्हाला एकूण १,०३,०८,०१५ रुपये मिळतील.
दुसरीकडे, जर तुम्ही ३० वर्षे या योजनेत योगदान देत राहिलात तर तुम्हाला १,५४,५०,०११ रुपये मॅच्युरिटी अमाउंट म्हणून मिळू शकतात आणि जर तुम्ही ही गुंतवणूक ३५ वर्षे कायम ठेवली तर मॅच्युरिटी ची रक्कम २,२६,९७,८५७ रुपये होईल. पीपीएफ योजनेचा एक फायदा म्हणजे जमा केलेले पैसे, मिळालेलं व्याज आणि मॅच्युरिटीवर मिळणारी रक्कम पूर्णपणे करमुक्त असते.