सीनिअर सिटिझन्ससाठी सुपरहिट आहे Post Officeची 'ही' स्कीम, ५ वर्षात केवळ व्याजातूनच मिळतील ₹१२,३०,००० By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 08:52 AM 2024-10-23T08:52:55+5:30 2024-10-23T09:12:52+5:30
निवृत्तीनंतर ज्येष्ठांकडे उत्पन्नाचे कोणतेही ठोस स्त्रोत नसतात. त्यांच्याकडे लाइफटाइम कॅपिटल म्हणजेच रिटायरमेंट फंड असतो जो ते स्वत:च्या गरजेनुसार नुसार वापरू शकतात. Senior Citizens Savings Scheme: सध्या गुंतवणूक ही काळाची गरज आहे. भविष्याच्या दृष्टीनं गुंतवणूक ही महत्त्वाची आहे. निवृत्तीनंतर ज्येष्ठांकडे उत्पन्नाचे कोणतेही ठोस स्त्रोत नसतात. त्यांच्याकडे लाइफटाइम कॅपिटल म्हणजेच रिटायरमेंट फंड असतो जो ते स्वत:च्या गरजेनुसार नुसार वापरू शकतात आणि ते तो गुंतवतात जेणेकरून त्यांचा पैसा कालांतराने वाढत राहील.
गुंतवणुकीच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची जोखीम घेणे बहुतांश ज्येष्ठ नागरिकांना आवडत नाही. ते अशा योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात, जिथून त्यांना खात्रीशीर परतावा मिळू शकतो. सुरक्षित गुंतवणूकीसाठी अनेक दण पोस्टातील गुंतवणूकीला प्राधान्य देतात.
ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्ट ऑफिसद्वारेही (Post Office) अशा स्कीम्स चालवल्या जातात, ज्यामध्ये त्यांना चांगला परतावा आणि उत्तम व्याज मिळतं. या स्कीमचं नाव म्हणजे सीनिअर सिटिझन सेव्हिंग स्कीम (Senior Citizen Savings Scheme). यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना केवळ व्याजाच्या माध्यमातून १२,३०,००० रुपयांची कमाई करता येऊ शकते.
पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही एक डिपॉझिट स्कीम आहे. यामध्ये ५ वर्षांसाठी ठराविक रक्कम जमा केली जाते. ज्येष्ठ नागरिक या योजनेत जास्तीत जास्त ३०,००,००० रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतात, तर किमान १००० रुपयांची गुंतवणूक करता येते. सध्या या स्कीमवर सध्या ८.२ टक्के दरानं व्याज मिळत आहे.
या योजनेत तुम्ही जास्तीत जास्त ३०,००,००० रुपयांपर्यंत रक्कम जमा करू शकता. जर तुम्ही ही रक्कम या योजनेत गुंतवली तर तुम्हाला ५ वर्षात ८.२% दरानं १२,३०,००० रुपयांचं व्याज मिळेल. प्रत्येक तिमाहीला ६१,५०० रुपये व्याज म्हणून जमा केले जातील. अशा प्रकारे ५ वर्षांनंतर तुम्हाला मॅच्युरिटी अमाउंट म्हणून एकूण ₹४२,३०,००० मिळतील.
दुसरीकडे जर तुम्ही या योजनेत ५ वर्षांसाठी १५ लाख रुपये जमा केले तर सध्याच्या ८.२ टक्के व्याजदरानुसार तुम्हाला ५ वर्षात फक्त व्याज म्हणून ६,१५,००० रुपये मिळतील. जर तुम्ही तिमाही आधारावर व्याजाचा हिशोब केला तर तुम्हाला दर तीन महिन्यांनी ३०,७५० रुपये व्याज मिळेल. अशा प्रकारे १५,००,००० आणि व्याजाची रक्कम ६,१५,००० जोडून एकूण २१,१५,००० रुपये मॅच्युरिटी अमाउंट म्हणून मिळतील.
ज्यांचं वय ६० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त आहे ते यात गुंतवणूक करू शकतात. त्याचबरोबर व्हीआरएस घेणाऱ्या सिव्हिल सेक्टरमधील सरकारी कर्मचारी आणि संरक्षण क्षेत्रातून निवृत्त होणाऱ्या व्यक्तींना काही अटींसह वयोमर्यादेत सूट दिली जाते. ही योजना पाच वर्षांनंतर मॅच्युअर होते.
जर तुम्हाला ५ वर्षांनंतरही या योजनेचा लाभ सुरू ठेवायचा असेल तर डिपॉझिटची रक्कम मॅच्युअर झाल्यानंतर तुम्ही खात्याचा कालावधी तीन वर्षांसाठी वाढवू शकता. मुदतपूर्तीनंतर १ वर्षाच्या आत ही मुदत वाढवता येते. विस्तारित खात्यावर मुदतपूर्तीच्या तारखेला लागू असलेल्या दरानं व्याज मिळतं. या स्कीममध्ये कर सुटीचा लाभही मिळतो.