Post Office Scheme: जबरदस्त! महिन्याला २० हजारांपेक्षा जास्त कमवाल; पोस्ट ऑफिसची 'ही' योजना करेल मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 09:41 AM2024-08-30T09:41:48+5:302024-08-30T09:49:28+5:30

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची एक जबरदस्त योजना आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यास आपल्याला मोठा परतावा मिळतो.

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसने एक महत्वपूर्ण योजना लाँच केली आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला निवृत्तीनंतर दर महिन्याला मोठी रक्कम मिळेल.

या योजनेत एकरकमी गुंतवणूक करून तुम्ही महिन्याला उत्पन्न मिळवू शकता. ही एक सरकारी योजना आहे, यात अल्पबचत योजनेअंतर्गत चालते. ही योजना सेवानिवृत्ती नियोजनासाठी लोकप्रिय योजनांपैकी एक मानली जाते.

पोस्ट ऑफिस योजनांची एक उत्तम योजना म्हणजे ज्येष्ठ नागरिक बचत योजना आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना पाच वर्षांसाठी दरमहा सुमारे २० हजार रुपये देऊ शकते.

या सरकारी योजनेत ८.२ टक्के व्याजही मिळते. SCSS योजनेंतर्गत, ५ वर्षांनंतर या योजनेचे तुम्हाला पैसे मिळतील. यामध्ये मासिक गुंतवणुकीऐवजी तुम्ही एकदाच पैसे गुंतवू शकता.

पोस्ट ऑफिसच्या या अल्पबचत योजनेंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना लाभ दिला जातो. यामध्ये फक्त ६० वर्षांवरील लोकच गुंतवणूक करू शकतात. सध्या ही योजना ८.२ टक्के परतावा देते.

६० वर्षांवरील कोणताही भारतीय नागरिक या योजनेत एकरकमी पैसे जमा करू शकतो. या योजनेत जास्तीत जास्त ३० लाख रुपये गुंतवले जाऊ शकतात, पूर्वी ही रक्कम १५ लाख रुपये होती.

सिनियर सिटीझन सेव्हिंग स्कीम अंतर्गत तुम्ही ३० लाख रुपये गुंतवल्यास तुम्हाला दरवर्षी सुमारे २ लाख ४६ हजार रुपये व्याज मिळेल. आता ही रक्कम मासिक आधारावर मोजली तर ही रक्कम २०,५०० रुपये होईल.

या योजनेअंतर्गत ५५ ते ६० वर्षांच्या दरम्यान स्वेच्छानिवृत्ती घेणारे लोकही खाते उघडू शकतात. हे खाते जवळच्या पोस्ट ऑफिस शाखेत जाऊन उघडता येते.

या योजनेअंतर्गत उत्पन्न मिळवणाऱ्या नागरिकांनाही कर भरावा लागतो. जरी या बचत योजनेवरील व्याज ५० हजार रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्यावर TDS भरावा लागेल, पण जर तुम्ही फॉर्म 15G/15H भरला असेल तर व्याजावर TDS कापला जाणार नाही.