Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त स्कीम! 10 हजार लावा अन् 16 लाख मिळवा; जाणून घ्या डिटेल्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2022 03:52 PM2022-06-05T15:52:27+5:302022-06-05T15:56:57+5:30

Post Office Scheme: जर तुम्हाला सुरक्षित गुंतवणुकीसह चांगला परतावा हवा असेल, तर ही स्कीम तुमच्यासाठीच आहे.

Post Office Scheme: कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी जोखमीचा विचार करणे गरजेचे असते. अशा ठिकाणी गुंतवणूक करावी, जिथे तुमचे पैसे सुरक्षित असतील आणि तुम्हाला कमी जोखमीशिवाय चांगला परतावा मिळेल. इक्विटी मार्केटमध्ये जोखीम जास्त असल्याने परतावादेखील इतर गुंतवणूकींपेक्षा जास्त असतो. पण प्रत्येक व्यक्तीमध्ये जोखीम स्विकारण्याची क्षमता नसते. अशा परिस्थितीत, तुम्हाला जोखमी नसलेली गुंतवणूक हवी असेल, तर पोस्ट ऑफिस तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे.

पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. यामध्ये रिस्क फॅक्टरही कमी आहे आणि परतावादेखील चांगला मिळतो. आज आम्ही अशाच एका गुंतवणुकीबाबत सांगणार आहोत. ज्यामध्ये जोखमीशिवाय तुम्हाला चांगला परतावा मिळतो. पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट (Post Office Recurring Deposit) ही पोस्ट ऑफीसच्या चांगल्या योजनांपैकी एक आहे.

पोस्ट ऑफिस आरडीमध्ये गुंतवणूक कशी सुरू करावी? पोस्ट ऑफिस आरडी डिपॉझिट योजनेत लहान हप्ते भरुन तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. यामध्ये तुम्ही फक्त 100 रुपयांच्या छोट्या रकमेसह गुंतवणूक सुरू करू शकता. गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही, तुम्ही त्यात हवे तेवढे पैसे टाकू शकता.

या योजनेचे खाते पाच वर्षांसाठी उघडले जाते. बँका सहा महिने, 1 वर्ष, 2 वर्षे, 3 वर्षांसाठी रिकरिंग डिपॉझिट खात्याची सुविधा देतात. त्यात जमा केलेल्या पैशावर प्रत्येक तिमाहीत (वार्षिक दराने) व्याज मोजले जाते आणि प्रत्येक तिमाहीच्या शेवटी ते तुमच्या खात्यात (चक्रवाढ व्याजासह) जोडले जातात.

तुम्हाला किती व्याज मिळेल? सध्या, रिकरिंग डिपऑझिट योजनेवर 5.8% व्याज मिळते. हा नवीन दर 1 एप्रिल 2020 पासून लागू आहे. भारत सरकार प्रत्येक तिमाहीत आपल्या सर्व लहान बचत योजनांचे व्याजदर निश्चित करते.

दर महिन्याला 10 हजार टाकले तर 16 लाख मिळतील- जर तुम्ही पोस्ट ऑफिस आरडी स्कीममध्ये 10 वर्षांसाठी दरमहा 10 हजार रुपये गुंतवले तर 10 वर्षांनंतर तुम्हाला 5.8% दराने 16 लाखांपेक्षा जास्त रुपये मिळतील. तुम्ही, दरमहा 10 हजार गुंतवल्यानंतर 5.8% व्याजाने तुम्हाला 10 वर्षानंतर रु. 16,28,963 मिळतील.

आरडी खात्याबद्दल महत्त्वाच्या गोष्टी- तुम्हाला या खात्यात नियमित पैसे जमा करत राहावे लागेल. जर तुम्ही पैसे जमा केले नाहीत तर तुम्हाला दरमहा एक टक्का दंड भरावा लागेल. 4 हप्ते चुकल्यानंतर तुमचे खाते बंद केले जाते.

पोस्ट ऑफिस RD वर कर- या गुंतवणुकीवर TDS कापला जातो, जर ठेव रु. 40,000 पेक्षा जास्त असेल तर वार्षिक 10% दराने कर आकारला जातो. RD वर मिळालेले व्याज देखील करपात्र आहे, परंतु संपूर्ण मॅच्युरिटी रकमेवर कर आकारला जात नाही. ज्या गुंतवणूकदारांकडे कोणतेही करपात्र उत्पन्न नाही ते FD प्रमाणेच फॉर्म 15G भरून TDS सूटचा दावा करू शकतात.