Post Officeच्या ‘टॉप ५’ योजना! गॅरंटेड रिटर्न्स, लाखोंचा लाभ, टॅक्सही नाही; तुम्ही घेतलीय ना?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 09:32 AM2023-01-11T09:32:20+5:302023-01-11T09:40:49+5:30

Post Office Investments: गुंतवणुकीचे अत्यंत विश्वासू माध्यम म्हणून पोस्ट ऑफिसच्या योजनांकडे पाहिले जाते. पोस्ट ऑफिसच्या बेस्ट योजना जाणून घ्या...

देशात गेल्या अनेक दशकांपासून Post Office हे भारतीयांचे अढळ विश्वासाचे स्थान आहे. पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना आताच्या घडीला उपलब्ध असून, कोट्यवधी देशवासी नानाविध योजनांचा लाभ घेत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात पोस्ट ऑफिस अनेक प्रकारच्या सुविधा प्रदान करते. (Investment Tips)

Post Office अजूनही गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम पर्याय मानला जातो. पोस्ट ऑफिसमध्ये तुमचे पैसेही सुरक्षित राहतात, यासोबतच तुम्हाला हमखास परतावाही मिळतो. पोस्ट ऑफिस योजनांव्यतिरिक्त पोस्ट ऑफिस विमा उत्पादने उपलब्ध करून देते.

Post Officeच्या माहितीनुसार, पोस्ट ऑफिसमधून आतापर्यंत ५० लाखांहून अधिक पॉलिसी (पोस्ट ऑफिस इन्शुरन्स) विकल्या गेल्या आहेत. ही देशातील सर्वात जुन्या विमा कंपन्यांपैकी एक आहे. याशिवाय पोस्ट ऑफिसच्या काही खास योजना आहेत, या माध्यमातून तुम्हाला केवळ निश्चित उच्च परतावा मिळत नाही, तर या योजनांमधील गुंवतणुकीवर टॅक्सही लागत नाही.

Post Officeच्या अनेक योजना आहेत. या योजनांमध्ये केवळ उत्तम नफा आणि सुरक्षिततेचा पर्याय उपलब्ध नाही. पण इतरही अनेक सुविधा उपलब्ध आहेत. पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना आहेत, ज्या खूप प्रसिद्ध आहेत, या योजनांमध्ये रिटर्नच्या हमीसह, कर सूट देण्याची सुविधा उपलब्ध आहे. Post Office टॉप ५ योजनांबाबत जाणून घ्या...

सुकन्या समृद्धी योजना (sukanya samriddhi yojana) ही प्रसिद्ध पोस्ट ऑफिस योजनांपैकी एक आहे. ही योजना भारत सरकार मुलींसाठी चालवते. या योजनेत ७.६ टक्के व्याज उपलब्ध आहे, ज्यासाठी १० वर्षांपर्यंतच्या मुली अर्ज करू शकतात. या योजनेत, आयकर कायदा ८० सी अंतर्गत कर सूट मिळण्याची सुविधा उपलब्ध आहे. यासोबतच तुम्हाला लाखो रुपयांचा चांगला परतावाही मिळतो.

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना (post office monthly income plan) ही उत्कृष्ट योजनांपैकी एक आहे. यामध्ये गुंतवणूक केल्याने तुम्हाला चांगले व्याज तर मिळतेच शिवाय चांगला परतावाही मिळतो. या योजनेंतर्गत कर सवलत उपलब्ध आहे. परंतु केवळ ४.५ लाखांपेक्षा जास्त गुंतवणूक करता येत नाही.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) ही सर्वोत्तम योजनांपैकी एक आहे. यामध्ये १५ वर्षांसाठी गुंतवणूक करणे हा तुमच्यासाठी चांगला पर्याय असू शकतो. त्याचा व्याजदर ७.१ टक्के आहे. यावर करात सूटही मिळते.

नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) ही भारत सरकारद्वारे चालवली जाणारी योजना आहे. ते ५ वर्षांनंतर मॅच्युरिटी मिळते. यासोबतच ७ टक्के व्याजही मिळते. गुंतवणूकदार यामध्ये १०० रुपयांपासून गुंतवणूक करू शकतात. यामध्ये करात सूट देण्याची सुविधाही देण्यात आली आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिक योजना (post office senior citizen scheme) राबविली जाते. या योजनेत ५ वर्षांनंतर म्यॅचुरिटी मिळते. त्यासाठी हजार रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येते. त्यावर ८ टक्के व्याज मिळते, परंतु या योजनेत १५ लाखांपेक्षा जास्त गुंतवणूक करता येत नाही. (टीप - या लेखात केवळ गुंतवणूकीसंदर्भात माहिती देण्यात आली आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा आणि जाणकारांचा सल्ला घ्यावा.)