PPF Account Benefits: SBI ग्राहक घरबसल्या काढू शकतात PPF खाते, टॅक्समध्ये मिळेल बंपर सूट; जाणून घ्या प्रोसेस By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 03:25 PM 2022-02-08T15:25:14+5:30 2022-02-08T15:29:38+5:30
PPF Account Benefits:सध्या पीपीएफ खात्यावर 7.1 टक्के व्याज दिले जात आहे. तज्ज्ञांच्या मते, पीपीएफमध्ये दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक केल्यास चक्रवाढ व्याजाचा मोठा फायदा होतो. भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी PPF (Public Provident Fund) हा सर्वोत्तम पर्याय आहे. यात कर सवलतीसह अनेक फायदे मिळतात. यामध्ये गुंतवणुक केल्यास मिळणारा परतावा, मुदतपूर्तीची रक्कम आणि एकूण व्याज पूर्णपणे करमुक्त आहे. यात, तुम्हाला आयकर कलम 80C अंतर्गत 1,50,000 च्या गुंतवणुकीवर कर सूट मिळते.
सध्या पीपीएफ खात्यावर 7.1 टक्के व्याज दिले जात आहे. तज्ज्ञांच्या मते, पीपीएफमध्ये दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक केल्यास चक्रवाढ व्याजाचा मोठा फायदा होतो.
देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) देखील ग्राहकांना PPF खाते ऑनलाइन उघडण्याची परवानगी देते.
पीपीएफ खाती उघडण्यासाठी नावनोंदणी फॉर्म, पासपोर्ट आकाराचा फोटो, पॅन कार्डची प्रत, आयडी पुरावा आणि रहिवासी पुरावा आवश्यक आहे.
बँकेच्या केवायसी नियमांनुसार, खाते उघडण्यासाठी तुमच्याकडे ही कागदपत्रे असणे आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊया देशातील सर्वात मोठी बँक SBI मध्ये PPF खाते उघडण्याची प्रक्रिया.
यासाठी सर्वप्रथम SBI Net Banking Portal - onlinesbi.com वर जा आणि लॉगिन करा. आता 'Request and Enquiries' टॅबवर जा आणि 'New PPF Account' पर्यायावर क्लिक करा.
नंतर 'पीपीएफ खात्यासाठी अर्ज करा' ऑप्शनवर क्लिक करा, येथे स्क्रीनवर, नाव, पॅन आणि पत्ता यासारखे आवश्यक तपशील भरा.
यानंतर ज्या बँकेचे खाते उघडायचे आहे, त्या बँकेच्या शाखेचा कोड टाका. आता तुमचा नामनिर्देशित तपशील प्रविष्ट करा आणि सबमिट करा.
यानंतर तुम्हाला एक OTP मिळेल, जो तुम्हाला एंटर करावा लागेल आणि फॉर्म प्रिंट करण्यासाठी 'Print PPF Account Online Application' वर क्लिक करा.
यानंतर KYC कागदपत्रे आणि छायाचित्रांसह 30 दिवसांच्या आत शाखेला भेट द्या. SBI नुसार फॉर्म सबमिट केल्याच्या तारखेपासून 30 दिवसांनंतर हटविला जातो. यानंतर तुमचे पीपीएफ खाते ओपन होईल.