PPF Crorepati Planning Tips: 1.5 लाख रुपयांत करोडपती? होय, ही योजना बनवते, जाणून घ्या... By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2022 12:37 PM 2022-01-03T12:37:58+5:30 2022-01-03T12:42:58+5:30
PPF Crorepati Planning Tips: ५०० रुपयांपासून बचतीला सुरुवात करता येते. या अकाऊंटमध्ये वार्षिक कमाल दीड लाख रुपये तर दरमहा साडेबारा हजार रुपयांपर्यंतची रक्कम जमा करता येऊ शकते. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड अर्थात पीपीएफमध्ये गुंतवणूक करायची असेल तर ५०० रुपयांपासून सुरुवात करता येऊ शकते. दीर्घ कालावधीपर्यंत ही गुंतवणूक सुरू ठेवली तर करोडपती बनण्याची संधी नक्कीच उपलब्ध होते.
पीपीएफमधील गुंतवणूक पीपीएफमध्ये ५०० रुपयांपासून बचतीला सुरुवात करता येते. या अकाऊंटमध्ये वार्षिक कमाल दीड लाख रुपये तर दरमहा साडेबारा हजार रुपयांपर्यंतची रक्कम जमा करता येऊ शकते. पीपीएफची मॅच्युरिटी १५ वर्षांची असते. त्यानंतर तुम्ही पाच वर्षांसाठी त्यात वाढ करू शकता.
बचतीची सवय बरी... नोकरीला लागल्यानंतर बचतीची सवय अंगीकारलेलीच बरी, असे जाणकार सांगतात. गुंतवणुकीचे अनेक पर्याय बाजारात उपलब्ध असतात. तुम्ही जर सरकारी योजनांमध्ये आपली ठरावीक रक्कम बचत म्हणून ठेवण्याचे निश्चित केले तर त्याचा लाभ होतो.
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ) हा त्यातला उत्तम पर्याय आहे. पोस्टातील बचत योजनाही बचतीसाठीचा चांगला पर्याय ठरतो.
करोडपती होण्याची संधी दीर्घकाळापर्यंत पैशांची बचत करत राहिल्यास मध्यमवयातच भक्कम आर्थिक निधी जमा होऊ शकतो.
उदाहरणार्थ समजा तुम्ही दरवर्षी दीड लाख रुपये या प्रमाणे २५ वर्षे बचत केली तर तुमच्या खात्यात ३७ लाख ५० हजार रुपये जमा होतात.
७.१% व्याज मिळविल्यास ६५ लाख ५८ हजार रुपये रक्कम तयार होते. तसेच मॅच्युरिटी अमाऊंट १ कोटी तीन लाख रुपये होते. याचाच अर्थ २५ वर्षात तुम्ही करोडपती होऊ शकता.
करसवलतही मिळते पीपीएफमधील गुंतवणूक करमुक्त असल्याने प्राप्तिकरात सूटही मिळते. म्हणून नव्याने रोजगार मिळालेल्यांनी पीपीएफमध्ये आपले बचत खाते सुरू करणे इष्ठ ठरते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.