PPF: पीपीएफमध्ये सरकारने केले पाच मोठे बदल, होईल असा परिणाम, पैसे भरण्यापूर्वी जाणून घ्या By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2022 06:15 PM 2022-05-09T18:15:58+5:30 2022-05-09T18:19:00+5:30
PPF: जर तुमचंही पीपीएफ खातं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सरकारकडून वेळोवेळी सर्व जमा योजनांच्या नियमांमध्ये बदल करण्यात येत असतो. हे बदल अनेकदा मोठे असतात. तर अनेकदा किरकोळ असतात. आता पीपीएफ योजनेच्या नियमांमध्ये सरकारकडून काही मोठे बदल करण्यात आले आहेत. जर तुमचंही पीपीएफ खातं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सरकारकडून वेळोवेळी सर्व जमा योजनांच्या नियमांमध्ये बदल करण्यात येत असतो. हे बदल अनेकदा मोठे असतात. तर अनेकदा किरकोळ असतात. आता पीपीएफ योजनेच्या नियमांमध्ये सरकारकडून काही मोठे बदल करण्यात आले आहेत.
पीपीएफ खात्यामध्ये तुमचं योगदान हे ५० रुपयांच्या पटीत असले पाहिजे. ही रक्कम वर्षाला किमान ५०० रुपये किंवा त्यापेक्षा अधिक असली पाहिले. मात्र पीएफ अकाऊंटमध्ये जमा करण्यात आलेली रक्कम संपूर्ण वर्षात दीड लाख रुपयांपेक्षा अधिक असता कामा नये. त्याशिवाय तुम्ही एका महिन्यात एकदाच पीपीएफमध्ये पैसे जमा करू शकता.
पीपीएफ खाते उघण्यासाठी आता फॉर्म ए च्या जागी फॉर्म-१ जमा करावा लागेल. १५ वर्षांनंतर पीपीएफ खात्याच्या विस्तारासाठी मॅच्युरिटीसाठी एक वर्षापूर्वी फॉर्म एच ऐवजी फॉर्म-४मध्ये अर्ज करावा लागेल.
पैसे जमा केल्याशिवाय तुम्ही तुमच्या पीपीएफ अकाऊंटला १५ वर्षांनंतर सुरू ठेवू शकतात. त्यामध्ये तुमच्यासाठी पैसे जमा करणे अनिवार्य नसते. मॅच्युरिटीनंतर जर पीपीएफ अकाऊंटचा विस्तार करण्याचा पर्याय निवडत असाल तर एका आर्थिक वर्षात तुम्ही एकदाच पैसे काढू शकता.
पीपीएफमध्ये जमा रकमेवर जर तुम्ही कर्ज घेत असाल तर व्याजदर दोन टक्क्यांनी घटून एक टक्का करण्यात आला आहे. कर्जाच्या मूळ रकमेचा भरणा केल्यानंतर तुम्हाला दोन पेक्षा जास्त पटींनी व्याज चुकवावे लागेल. व्याजाची गणना दर महिन्याच्या पहिल्या तारखेपासून होते.
तुम्हाला जर पीपीएफ अकाऊंटवर कर्ज घ्यायचे असेल तर अर्ज करण्याच्या तारखेच्या दोन वर्षे आधीपर्यंत खात्यात उपलब्ध असलेल्या पीपीएफ बॅलन्सपैकी २५ टक्के रकमेवरच कर्ज घेऊ शकता.