PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2024 09:37 AM 2024-05-04T09:37:57+5:30 2024-05-04T09:44:01+5:30
PPF Vs NPS: पीपीएफ आणि एनपीएस या दीर्घकालीन बचत योजना आहेत, या निवृत्तीसाठी पैसे वाचवण्यासाठी चांगला पर्याय आहेत. हा गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय मानला जातो. PPF Vs NPS: पीपीएफ आणि एनपीएस या दीर्घकालीन बचत योजना आहेत, या निवृत्तीसाठी पैसे वाचवण्यासाठी चांगला पर्याय आहेत. हा गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय मानला जातो. एनपीएस हा एक रिटायरमेंट सेव्हिंग प्लॅन आहे, ज्याद्वारे गुंतवणूकदारांना त्यांच्या भविष्यासाठी गुंतवणूक करता येते. यामध्ये ६० टक्के गुंतवणूक निवृत्तीच्या वेळी काढता येते आणि उर्वरित ४० टक्के रक्कम पेन्शन योजनेसाठी वापरली जाते. जाणून घेऊया या दोन्हींचे फायदे आणि तोटे.
पीपीएफ ही केंद्र सरकारद्वारे चालवली जाणारी दीर्घकालीन बचत योजना आहे. निवृत्तीसाठी पैसे वाचवण्यासाठी हा एक चांगला पर्याय मानला जातो. तज्ज्ञांच्या मते पीपीएफ हा गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय मानला जाऊ शकतो. त्यावर सरकार परतावा ठरवते.
पीपीएफमध्ये गुंतवलेल्या रकमेवर कोणतीही कमाल मर्यादा नाही. ही योजना १५ वर्षांसाठी आहे. पीपीएफ खात्यात तुम्ही वर्षाकाठी ५०० रुपयांपासून १.५ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. कर बचतीच्या दृष्टीनं पीपीएफमध्ये गुंतवणूक करणं चांगलं मानलं जातं, कारण गुंतवलेल्या रकमेवर आणि मिळणाऱ्या व्याजावर कोणताही कर लागत नाही.
इन्कम टॅक्सच्या कलम ८० सी नुसार हा पैसा करमुक्त आहे. भारतीय नागरिक आणि १८ वर्षांवरील कोणीही पीपीएफ खातं उघडून त्यात गुंतवणूक करू शकतो.
एनपीएस हा एक रिटायरमेंट सेव्हिंग प्लॅन आहे. ही एक सरकारी योजना आहे जी नागरिकांना त्यांच्या भविष्यासाठी गुंतवणूक करण्याचा पर्याय देते. एनपीएसमधील ६० टक्के गुंतवणूक निवृत्तीच्या वेळी काढता येते. उर्वरित ४० टक्के रक्कम पेन्शन योजना खरेदीसाठी वापरली जाते.
एनपीएस ही निश्चित परताव्याची गुंतवणूक नाही. एनपीएसवरील परतावा बाजारातील जोखमीशी निगडित असतो. एनपीएसमध्ये १८ ते ७० वर्षे वयोगटातील कोणतीही भारतीय नागरिकासाठी गुंतवणूक करू शकते. कोणतीही व्यक्ती या योजनेत सामील होऊन नियमित पणे गुंतवणूक करून लाभ घेऊ शकते.