कोरोनाच्या संकटात महिन्याला अवघे 55 रुपये जमा करा अन् दरमहा मिळवा 3 हजार, मोदी सरकारची जबरदस्त योजना By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 08:01 AM 2020-07-17T08:01:48+5:30 2020-07-17T08:15:31+5:30
या संकटात मोदी सरकारच्या विशेष योजनेत जर तुम्ही 55 रुपये मासिक गुंतवणूक करत असाल तर वयाच्या 60व्या वर्षानंतर दरमहा 3 हजार रुपये पेन्शन आपल्याला मिळणार आहे. केंद्र सरकारच्या अनेक अशा योजना आहेत, ज्या कोरोना काळात आपल्याला दिलासा देऊ शकतात. कोरोनाच्या कालावधीत केलेली छोटी गुंतवणूक म्हातारपणात आपला मोठा आधार बनू शकते.
या संकटात मोदी सरकारच्या विशेष योजनेत जर तुम्ही 55 रुपये मासिक गुंतवणूक करत असाल तर वयाच्या 60व्या वर्षानंतर दरमहा 3 हजार रुपये पेन्शन आपल्याला मिळणार आहे. किंबहुना मोदी सरकारने असंघटित कामगारांसाठी गेल्या वर्षी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना (Pradhan Mantri Shram Yogi Maandhan Yojana) योजना सुरू केली होती.
या योजनेत आतापर्यंत 39 लाखांहून अधिक लोकांनी नोंदणी केली आहे. विशेष म्हणजे या योजनेत असंघटित क्षेत्रात काम करणारे कोणतेही कर्मचारी किंवा नागरिक सामील होऊ शकतात, ज्यांचे वय 18 ते 40 वर्षांदरम्यान आहे. त्याच वेळी, त्याचे मासिक उत्पन्न 15,000 पेक्षा कमी असले पाहिजे.
या योजनेंतर्गत ६० वर्षे वयानंतर दरमहा ३००० रुपये पेन्शन मिळण्यासाठी किमान 55 रुपये आणि महिन्यात जास्तीत जास्त 200 रुपये जमा करावे लागतील.
वयाच्या 18व्या वर्षी आपण या योजनेत सामील असाल तर आपल्याला दरमहा फक्त 55 रुपये जमा करावे लागतात. त्याचबरोबर वयाच्या 29व्या वर्षी सामील झाल्यास आपल्याला प्रत्येक महिन्याला 100 रुपये आणि 40 वर्षांच्या वयामध्ये सामील होण्यासाठी प्रत्येक महिन्यात 200 रुपये द्यावे लागतील.
प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन पेन्शन योजनेत नोंदणीसाठी जवळच्या CSC केंद्राला भेट द्यावी लागेल. त्यानंतर आधार कार्ड आणि बचत खाते किंवा जन धन खात्याबद्दल IFSC कोडसह माहिती द्यावे लागेल. पासबुक, चेकबुक किंवा बँक स्टेटमेंट पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाऊ शकते.
खाते उघडताना तुम्ही नामनिर्देशित व्यक्तीची नोंदणी देखील करू शकता. एकदा आपला तपशील कॉम्प्युटरमध्ये नोंदविला गेल्यानंतर मासिक योगदानाची माहिती सापडेल.
आपल्याला सुरुवातीची रक्कम रोख स्वरूपात द्यावी लागेल. यानंतर आपले खाते उघडेल आणि आपल्याला श्रमयोगी कार्ड मिळेल. या योजनेची माहिती आपण 1800 267 6888 टोल फ्री क्रमांकावर मिळवू शकता.
मासिक योगदान द्यायचं विसरल्यास आपण योजनेंतर्गत आवश्यक योगदान देण्यात अयशस्वी ठरल्यास थकबाकीसह व्याज द्यावे लागेल. त्यानंतर आपण पुन्हा सामान्य मार्गाने आपले योगदान सुरू करू शकता.
जर आपल्याला या योजनेत सामील झाल्यापासून 10 वर्षांच्या आत पैसे काढायचे असतील तर आपले पैसे बचत खात्याच्या व्याजदरासह परत केले जातील.