procedure to change aadhaar card photo offline know more about process
Aadhaar Card वरचा फोटो आवडला नाही? बदलण्यासाठी ही आहे सर्वात सोपी पद्धत By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 10:43 AM2021-08-12T10:43:24+5:302021-08-12T10:50:31+5:30Join usJoin usNext Aadhaar Card : पाहा कसा बदलता येईल फोटो, स्टेप बाय स्टेप प्रोसेस. अनेकदा आपण आधार कार्डावर फोटो चांगला आला नाही, अशा तक्रारी करत असतो. आता तो फोटो बदलण्याचा पर्यायही तुमच्या जवळ उपलब्ध आहे. UIDAI यापूर्वी आधार क्रमांकावर नाव, पत्ता आणि मोबाईल क्रमांक बदलण्यासोबत फोटोग्राफही ऑनलाईन अपडेट करण्याची सुविधा मिळत होती. परंतु काही दिवसांपूर्वी UIDAI नं घसबसल्या पत्ता बदलण्याची देण्यात आलेली सेवा बंद केली होती. तसंच पुढील आदेश येईपर्यंत ही सेवा बंद ठेवण्यात येणार असल्याचं आधारनं सांगितलं होतं. त्यामुळे आता नाव, मोबाईल क्रमांक, जन्म तारीख, ईमेल अॅड्रेस, पत्ता आणि फोटो बदलण्यासाठी तुम्हाला ऑफलाईन प्रक्रियेचाच वापर करावा लागणार आहे. जर तुम्हाला आधार कार्डावरील तुमचा फोटो बदलायचा असेल तर तुम्हाला तुमच्या नजीकच्या आधार केद्रात जाऊन त्यासाठी फॉर्म भरून द्यावा लागेल. यासाठी तुम्हाला आधार कार्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागणार आहे. त्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या Get Aadhaar सेक्शनमधून आधार नामांकन/अपडेट फॉर्म डाऊनलोड करावा लागेल. हा फॉर्म योग्यरित्या भरून तो आधार केंद्रात न्यावा लागेल. त्यानंतर आधार केंद्रात तुमच्या फिंगरप्रिन्ट्स, रॅटिना स्कॅन आणि फोटोग्राफ पुन्हा कॅप्चर केले जातील. नवं आधार कार्ड तयार करायचं असल्यास त्यासाठी कोणतंही शुल्क आकारलं जात नाही. परंतु आधार कार्डावर माहिती अपडेट करण्यासाठी तुम्हाला ५० रूपये शुल्कही जमा करावं लागेल. या क्रमांकाच्या माध्यमातून तुम्ही आपला अर्ज ऑनलाईन ट्रॅक करू शकता. यानंतर अपडेटेड फोटोसह तुम्हाला आधार कार्ड मिळण्यासाठी ९० दिवसांचा कालावधी लागेल. जर तुम्हाला आधार कार्डाच्या सेवा केंद्रात जायचं नसेल तर UIDAI च्या क्षेत्रीय कार्यालयाला पत्र लिहूनही तुम्ही तुमचं आधार कार्ड अपडेट करू शकता. यासाठी तुम्हाला UIDAI च्या पोर्टलवर जाऊन ‘Aadhaar Card Update Correction’ फॉर्म डाऊनलोड करावा लागेल. त्यात विचारलेल्या सर्व गोष्टीही भराव्या लागतील. या नंतर UIDAI च्या कार्यालयाच्या नावे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी एक पत्र लिहावं लागेल. त्यानंतर आपला सेल्फ अटेस्टेड फोटो सही करून अटॅच करा. फॉर्म आणि पत्र दोन्ही UIDAI च्या कार्यालयात पोस्टाद्वारे पाठवा. दोन आठवड्यांमध्ये तुम्हाला तुमचं नवं आधारकार्ड प्राप्त होईल.टॅग्स :आधार कार्डऑनलाइनभारतAdhar CardonlineIndia