PNB च्या खातेधारकांसाठी मोठी बातमी! उद्यापासून 'या' एटीएममधून पैसे काढता येणार नाहीत...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 06:12 PM2021-01-31T18:12:23+5:302021-01-31T18:30:05+5:30

नवी दिल्ली : देशातील वाढती एटीएम फसवणूक रोखण्यासाठी पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) एक मोठे पाऊल उचलले आहे. जर तुमचेही पंजाब नॅशनल बँकेमध्ये अकाऊंट असेल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे.

उद्यापासून म्हणजेच 1 फेब्रुवारी 2021 पासून पंजाब नॅशनल बँकेने ग्राहक नॉन-ईएमव्ही एटीएम (Non-EMV ATM) मशीनद्वारे व्यवहार करू शकणार नाहीत.

म्हणजेच, ग्राहक नॉन-ईव्हीएम मशीनमधून पैसे काढू शकणार नाही. गेल्या काही दिवासांपूर्वी पंजाब नॅशनल बँकेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर याबाबतची माहिती दिली आहे.

"आपल्या ग्राहकांना फसवणूकीपासून वाचवण्यासाठी 1 फेब्रुवारी 2021 पासून पंजाब नॅशनल बँक नॉन- ईएमव्ही एटीएम मशीनमधील ट्रांजक्शनवर (financial & non-financial) प्रतिबंधित करेल. गो-डिजिटल, गो-सेफ ...!" असे ट्विट पंजाब नॅशनल बँकेने ट्विट केले होते.

वाढत्या फसवणूकीच्या घटना लक्षात घेता पंजाब नॅशनल बँकेने हे पाऊल उचलले आहे. जेणेकरुन ग्राहकांचे पैसे सुरक्षित राहतील. 1 फेब्रुवारीपासून ग्राहक नॉन-ईएमव्ही एटीएममधून फायन्सशियल किंवा नॉन-फायन्सशियल व्यवहार करू शकणार नाहीत.

नॉन-ईएमव्ही एटीएम असे आहे की, ज्यामध्ये ट्रांजक्शनच्यावेळी कार्ड ठेवले जात नाही. यामध्ये मॅग्नेटिक स्ट्रिपच्या माध्यमातून डेटा रीड केला जातो. याशिवाय, ईएमव्ही एटीएममध्ये काही सेकंदांसाठी कार्ड लॉक केले जाते.

अलीकडेच पंजाब नॅशनल बँकेने आपल्या ग्राहकांना PNBOne अ‍ॅपद्वारे त्यांचे एटीएम डेबिट कार्ड चालू / बंद करण्याची सुविधा दिली आहे.

यानुसार, तुम्ही तुमचे कार्ड वापरल्यास नसाल तर ते बंद करू शकता. यामुळे आपल्या बँक खात्यात ठेवलेले आपले पैसे सुरक्षित राहतील.

दरम्यान, गेल्या डिसेंबर महिन्यात पंजाब नॅशनल बँकेने एटीएममधून पैसे काढण्यासंदर्भातील नियमांमध्ये बदल केले होते. ज्यामध्ये ओटीपी आधारित रोख रक्कम काढण्याची सुविधा सुरू करण्यात आली.

या सुविधेअंतर्गत, खातेदारांना 10,000 रुपयांहून अधिक रक्कम काढण्यासाठी वन टाइम पासवर्ड (ओटीपी) रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर पाठविला जातो. या ओटीपीशिवाय रोख रक्कम काढता येत नाही.