जनरल तिकीट काढल्यानंतर तुम्हाला किती तासांनी ट्रेन पकडावी लागेल? जाणून घ्या, नियम...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 03:21 PM2024-10-18T15:21:54+5:302024-10-18T15:30:22+5:30

Railway Rules : जर लांबचा प्रवास करायचा असेल तर बहुतेक लोक रेल्वेने प्रवास करणे पसंत करतात.

नवी दिल्ली : भारतात रेल्वेने दररोज करोडो प्रवासी प्रवास करतात. प्रवासाच्या संख्येच्या बाबतीत भारतीय रेल्वे ही जगातील चौथी सर्वात मोठी रेल्वे व्यवस्था आहे. जर लांबचा प्रवास करायचा असेल तर बहुतेक लोक रेल्वेने प्रवास करणे पसंत करतात.

रेल्वे प्रवास खूप सोयीस्कर असून तुम्हाला अनेक सुविधा मिळतात. रेल्वेने प्रवास करण्याबाबत भारतीय रेल्वेने काही नियम तयार केले आहेत. या नियमांचे पालन प्रवाशांना करावे लागते. तिकिटांबाबतही नियम आहेत.

भारतीय रेल्वेमध्ये तिकीटाशिवाय कोणीही प्रवास करू शकत नाही. असे केल्यास दंड आकारण्यात येतो. त्यामुळे लोक आरक्षण करून किंवा जनरल तिकीट काढून प्रवास करतात. अनेकांच्या मनात प्रश्न असतो की, जनरल तिकीट काढल्यानंतर किती तास ट्रेन पकडायची याचे नियम काय आहेत? तर याबाबत जाणून घ्या...

भारतीय रेल्वेच्या नियमांनुसार, जर एखाद्याला १९९ किलोमीटरपर्यंतचा प्रवास करायचा आहे. तर जनरल तिकीट खरेदी केल्यानंतर २४ तासांच्या आत ट्रेन पकडणे आवश्यक आहे. तसेच, जर प्रवास २०० किलोमीटर किंवा त्याहून अधिक असेल. तर अशा परिस्थितीत जनरल तिकीट ३ दिवस अगोदरही काढता येईल.

हा प्रवास १९९ किलोमीटरपेक्षा कमी आहे आणि ३ तासांच्या आत प्रवास केला नाही. तर अशा परिस्थितीत तुमचे तिकीट रद्द होणार नाही आणि तुम्ही प्रवास करू शकणार नाही. कारण ३ तासांनंतर तुमचे तिकीट अवैध होईल. पूर्वी बरेच लोक आपली जनरल तिकिट इतरांना विकायचे. अशा फसवणुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रेल्वेने हा नियम केला आहे.

सुरुवातीला काही काळ रेल्वेच्या अधिकृत तिकीट काउंटरवरच जनरल तिकिटे उपलब्ध होती. पण, आता भारतीय रेल्वेने यासाठी ऑनलाइन सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. आता यूटीएस ॲपद्वारेही तिकीट खरेदी करता येणार आहे. मात्र, त्यासाठी अंतराबाबत काही नियम करण्यात आले.