Indian Railway: रेल्वेने नवीन इकॉनॉमी AC-3 कोच प्रवाशांसाठी आणले, आधीपेक्षा किती वेगळे आहेत? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 12:57 PM2022-02-25T12:57:14+5:302022-02-25T13:01:14+5:30

Indian Railways: भारतीय रेल्वेने 2021 मध्ये AC-3 इकॉनॉमी कोच चालवण्यास सुरुवात केली आहे. हे थर्ड एसीसारखेच आहे.

भारतीय रेल्वे आपल्या सुविधांमध्ये सतत बदल करत असते. कोरोनानंतर रेल्वेने अनेक नवे बदल केले आहेत. अलीकडेच, रेल्वेने ट्रेनमध्ये इकॉनॉमी थर्ड एसी क्लास सुविधा सुरू केली आहे. याला AC-3 टियर इकॉनॉमी कोच ( AC 3 tier economy coach) असेही म्हणतात.

भारतीय रेल्वेने 2021 मध्ये AC-3 इकॉनॉमी कोच चालवण्यास सुरुवात केली आहे. हे थर्ड एसीसारखेच आहे. सामान्य लोकांना परवडणाऱ्या दरात आरामदायी प्रवास सुविधा उपलब्ध करून देणे हा त्याचा उद्देश आहे, जेणेकरून स्लीपर क्लासचे लोकही एसी कोचकडे आकर्षित होतील.

हा थर्ड एसी सारखा कोच असून ज्या सुविधा प्रवाशांना थर्ड एसीमध्ये दिल्या जातात, त्याच सुविधा या कोचमध्ये देण्यात आल्या आहेत. ज्या ट्रेनला AC-3 कोच आहेत, त्यात इकॉनॉमी कोच नाहीत, म्हणजेच एक प्रकारे तिची जागा थर्ड एसीने घेतली आहे.

जेव्हा हे थर्ड एसी सारखे आहे, तर दोघांमध्ये फरक काय? असा आता प्रश्न आणि संभ्रम निर्माण झाला असेल. तर आम्ही तुम्हाला सांगतो, AC-3 इकॉनॉमी कोच नवीन आहेत आणि त्यात आधुनिक सुविधांचा समावेश करण्यात आला आहे. त्याची रचनाही पूर्वीपेक्षा अधिक चांगल्या आणि वेगळ्या पद्धतीने करण्यात आली आहे.

दरम्यान, AC-3 च्या नवीन डब्यांना AC-3 Economy हे नाव देण्यात आले आहे. तुम्ही पाहिलं असेल की थर्ड एसीमध्ये 72 सीट्स आहेत, पण AC-3 इकॉनॉमीमध्ये 11 सीट्स जास्त आहेत. यामध्ये 83 सीट्स आहेत.

याशिवाय AC-3 इकॉनॉमी कोचच्या इंटीरियर डिझाइनमध्ये जबरदस्त बदल करण्यात आले आहेत. प्रत्येक सीटच्या प्रवाशांसाठी एसी डक स्वतंत्रपणे बसवण्यात आला आहे.

यासोबतच प्रत्येक सीटसाठी बॉटल स्टँड, रीडिंग लाईट आणि चार्जिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. जे थर्ड एसीमध्ये मिळत नाही. आतापर्यंत 8 गाड्यांमध्ये हे कोच बसवण्यात आले आहेत.