Railways stations redevelopment tailway may increase fare from ten rupees to 35 rupees
35 रुपयांपर्यंत वाढणार रेल्वे तिकीट! सरकार लवकरच करणार शिक्कामोर्तब By श्रीकृष्ण अंकुश | Published: September 29, 2020 04:21 PM2020-09-29T16:21:25+5:302020-09-29T16:34:07+5:30Join usJoin usNext आगामी काही दिवसांत रेल्वे तिकीट 35 रुपयांपर्यंत महाग होण्याची शक्यता आहे. या वाढीवर सरकार लवकरच शिक्कामोर्तब करेल, असा दावा पीटीआय या वृत्त संस्थेने केला आहे. वृत्त संस्थेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेस्थानकांच्या नूतनीकरणासाठी रेल्वे प्रवाशांना 10 रुपये ते 35 रुपयांपर्यंत अतिरिक्त भाडे द्यावे लागू शकते. यासंदर्भातील प्रस्तावाला रेल्वे अंतिम रूप देत आहे. हा प्रस्ताव लवकरच कॅबिनेटकडे मंजुरीसाठी पाठवला जाईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही भाडेवाढ युझर चार्जमुळे होत आहे. ज्या रेल्वेस्थानकांचे नूतनीकरण करण्यात येत आहे आणि जेथे प्रवाशांची वर्दळ अधिक आहे, केवळ अशाच स्थानकांसाठी युझर चार्ज घेण्यात येईल, असे रेल्वेने पूर्वीच स्पष्ट केले होते. रेल्वेने काही दिवसांपूर्वी सांगितले होते, की देशभरातील एकूण सात हजार रेल्वेस्थानकांपैकी किमान 700 ते 1000 रेल्वेस्थानके या श्रेणीत येतात. सुविधांच्या मोबदल्यात युझर चार्ज घेतला जात असतो. सध्या असे शुल्क, विमानतळांवर घेतले जाते. विमानतळांवर आकारला जाणारा युझर चार्ज हा तिकिटातच जोडला जातो. सांगण्याचा उद्देश हा, की विमान प्रवासाच्या तिकिटासाठी तुम्ही जे पैसे मोजता, त्यातच युझर चार्जदेखील असतो. भारतीय रेल्वे...टॅग्स :रेल्वेरेल्वे प्रवासीप्रवासीभारतीय रेल्वेrailwayRailway PassengerpassengerIndian Railway