Mutual Fund SIP मधून ५ वर्षांत उभा करा ५० लाखांचा फंड, पाहा किती करावी लागेल गुंतवणूक By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2023 01:03 PM 2023-01-22T13:03:33+5:30 2023-01-22T13:09:50+5:30
भारत हा बचतकर्त्यांचा देश आहे. पण तरुण पिढी बचतीच्या (Savings) बाबतीत फारशी पुढे नाही. पण तुम्ही थोडी गुंतवणूक करून तुमच्या भविष्यासाठी मोठा फंड जमा करू शकता. भारत हा बचतकर्त्यांचा देश आहे. पण तरुण पिढी बचतीच्या (Savings) बाबतीत फारशी पुढे नाही. पगाराचे पॅकेज कितीही मोठे असले तरी आजच्या तरुणाईला पुरेशी बचत करता येत नाही. आधुनिक जीवनशैलीतील वाढणारे खर्च हे त्यामागचे प्रमुख कारण आहे.
काही बचत असली तरी ती लोनच्या ईएमआयकडे (Loan EMI) जाते. अशा परिस्थितीत म्युच्युअल फंड एसआयपी (Mutual Fund SIP) हा बचतीचा सोपा आणि उपयुक्त मार्ग आहे. यामध्ये दर महिन्याला तुमच्या पगारातून एक निश्चित रक्कम ऑटो डेबिट केली जाते.
SIP गुंतवणुकीमुळे तुम्ही एक चांगला फंड तयार करू शकता. दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी एसआयपीद्वारे गुंतवणूक करणे हा तुमची संपत्ती वाढवण्याचा एक चांगला मार्ग आहे. बाजारातील परिस्थितीनुसार तुम्ही तुमची SIP रक्कम वाढवू किंवा कमी करू शकता.
एसआयपीद्वारे, दरमहा तुम्ही तुमच्या पगाराचा काही भाग गुंतवणूक पर्यायांमध्ये गुंतवू शकता. तुम्हाला शेअर बाजारात थेट गुंतवणुकीची जोखीम घ्यायची नसेल, तर तुम्ही म्युच्युअल फंड एसआयपीद्वारे गुंतवणूक करू शकता. ध्येय ठेवून गुंतवणूक करणे नेहमीच योग्य असते. यामुळे तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीतून किती परतावा हवा आहे हे कळू शकते.
तुम्हाला हवे असल्यास तुम्ही 5 वर्षात 50 लाख रुपयांचा निधीही तयार करू शकता. जर तुमचे टार्गेट 5 वर्षात 50 लाख रुपये उभे करायचे असेल तर तुम्हाला काय करावे लागेल आहे ते जाणून घेऊ.
तुम्हाला म्युच्युअल फंडात चांगला परतावा हवा असल्यास तुम्ही फ्लेक्सी कॅप फंड किंवा मल्टीकॅप फंडांमध्ये गुंतवणूक करू शकता. हे फंड वेगवेगळ्या मार्केट कॅप्सच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतात.
फ्लेक्सी कॅप फंड किंवा मल्टी कॅप फंड दरवर्षी 15 टक्क्यांपर्यंतचा परतावा देतात. जर तुम्हाला 5 वर्षांत 50 लाख रुपयांचा निधी उभारायचा असेल, तर तुम्हाला या फंडांमध्ये 55,750 रुपयांची मासिक एसआयपी करावी लागेल.
HDFC फ्लेक्सी कॅप फंडाने गेल्या वर्षी 19.40 टक्के परतावा दिला आहे आणि निप्पॉन इंडिया मल्टीकॅप फंडाने गेल्या वर्षी 15.90 टक्के परतावा दिला आहे. तर, त्यांचा कॅटेगरी एव्हरेज अनुक्रमे 2.59 टक्के आणि 5.91 टक्के होती. हे दोन्ही फंड गेल्या अनेक वर्षांपासून सातत्यपूर्ण कामगिरी करत आहेत. या फंडांचे मालमत्ता वाटप आणि गुंतवणुकीचे धोरण यातील वैविध्य यामुळे पडत्या बाजारपेठेतही ते चांगली कामगिरी करत आहेत.
कोणत्याही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूकदाराने त्याबद्दल पूर्ण माहिती घेतली पाहिजे. तसेच, निर्णय घेण्यापूर्वी विविध म्युच्युअल फंडांची तुलना करावी. यासह, तुम्ही तुमच्या गुंतवणुकीच्या उद्दिष्टांनुसार आणि जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार योग्य फंड निवडण्यास सक्षम राहू शकता. (टीप - या लेखामध्ये केवळ म्युच्युअल फंडांच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)