Rakesh Jhunjhunwala : राकेश झुनझुनवाला, विजय केडियांसह ६ दिग्गज गुंतवणूकदार ‘या’ शेअर्सवर आजमावतायत नशीब, पाहा लिस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2022 13:23 IST2022-07-22T13:01:00+5:302022-07-22T13:23:50+5:30
जर तुम्हाला स्टॉक मार्केटमधील दिग्गज गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओनुसार जर नशीब आजमवायला आवडत असेल तर ही तुमच्यासाठी बातमी असू शकते.

जर तुम्हाला स्टॉक मार्केटमधील दिग्गज गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओनुसार जर नशीब आजमवायला आवडत असेल तर ही तुमच्यासाठी बातमी असू शकते. खरेतर, बाजारातील अनुभवी इक्विटी गुंतवणूकदारांनी जून तिमाहीत त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये मोठा बदल केला आहे. काही शेअर्समध्ये त्यांनी आपली गुंतवणूक वाढवली, तर काही ठिकाणी त्यांनी गुंतवणूक कमी केली आहे.
जून तिमाहीत राकेश झुनझुनवाला, डॉली खन्ना, आशिष कचोलिया, विजय केडिया आणि इतर दिग्गज गुंतवणूकदारांनी कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली. तर कोणते शेअर्स आपल्या पोर्टफोलिओमधून काढले याची माहिती आपण पाहूया.
राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala)
प्राथमिक शेअरहोल्डिंग डेटा दर्शवितो की दिग्गज इक्विटी गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी 30 जूनपर्यंत एस्कॉर्ट्स कुबोटामध्ये सुमारे 1.4 टक्के हिस्सा वाढवला आहे. यापूर्वी 31 मार्च 2022 रोजी कंपनीच्या प्रमुख भागधारकांमध्ये त्यांचे नाव नव्हते. मात्र, याआधी त्यांनी ३१ डिसेंबरपर्यंत कंपनीच्या शेअरमध्ये ५.२ टक्के हिस्सा ठेवला होता. दुसरीकडे, राकेश झुनझुनवाला यांनी टाटा मोटर्स, ऑटोलाइन इंडस्ट्रीज आणि एनसीसी यासह इतर कंपन्यांमधील आपला हिस्सा कमी केली आहे.
डॉली खन्ना (Dolly Khanna)
चेन्नईस्थित गुंतवणूकदार डॉली खन्ना यांनी जून तिमाहीत चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन, नॅशनल ऑक्सिजन आणि मॉन्टे कार्लो फॅशन्स यांसारख्या शेअर्समधील आपला हिस्सा वाढवला आहे. खन्ना यांनी पॉन्डी ऑक्साइड अँड केमिकल्स (3.6 टक्क्यांवरून 3.9 टक्के), टिन्ना रबर इन्फ्रास्ट्रक्चर (1.6 टक्क्यांवरून 1.8 टक्के) आणि अजंता सोया (1.5 टक्के) या कंपन्यांमध्ये हिस्सा वाढवला आहे. त्याच वेळी, खेतान केमिकल्स अँड फर्टिलायझर्स, संदूर मॅंगनीज आणि आयन, रेन इंडस्ट्रीज आणि बटरफ्लाय गांधीमथी अप्लायन्सेस यांसारख्या स्टॉक्सना आपल्या पोर्टफोलिओतून बाहेर काढलं आहे.
आकाश भंसाली (Akash Bhansali)
आणखी एक इक्विटी गुंतवणूकदार म्हणजे आकाश भन्साळी जे त्यांच्या स्टॉक पिकिंग कौशल्यासाठी ओळखला जातो. जून तिमाहीत त्यांनी स्नायडर इलेक्ट्रीक इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये स्टेक्स 2.4 टक्क्यांवरून 2.6 टक्क्यांपर्यंत वाढवले. त्यांनी अरविंद फॅशन्स आणि वेलस्पन कॉर्पमधील काही भागभांडवल कमी केले.
आशीष कचोलिया (Ashish Kacholia)
ताज्या शेअरहोल्डिंग डेटानुसार, प्रख्यात गुंतवणूकदार आशिष कचोलिया यांनी ग्रॅविटा इंडिया, फेज थ्री, ला ओपाला आरजी, एक्सप्रो इंडिया, युनायटेड ड्रिलिंग टूल्स आणि फिनोटेक्स केमिकल या कंपन्यांचे स्टॉक त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये जोडले आहेत. तर 4.2 टक्क्क्यांच्या हिस्स्यासह त्यांनी या तिमाहीत इन्फ्लेम अप्लायंसेसच्या शेअर्सना अॅड केले आहे. मागील तिमाहीत प्रमुख भागधारकांमध्ये त्यांचे नाव नव्हते.
विजय केडिया (Vijay Kedia)
मुंबईस्थित गुंतवणूकदार विजय केडिया यांनीही जून तिमाहीत त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये मोठे बदल केले आहेत. यावेळी त्यांनी अल्कॉन इंजिनीअरिंग, वैभव ग्लोबल आणि सेरा सॅनिटरीवेअर सारख्या काही समभागांमध्ये आपला हिस्सा वाढवला आहे.
अनिल कुमार गोयल (Anil Kumar Goel)
अनिल कुमार गोयल जे मायक्रो आणि स्मॉल व्यवसाय निवडण्यासाठी ओळखले जातात. त्यांनी आपल्या पोर्टफोलिओमध्ये इंडसिल हायड्रो पॉवर आणि मॅंगनीज, नाहर कॅपिटल, नाहर स्पिनिंग मिल्स, प्रीकोट आणि उत्तम साखर मिल यांसारखे स्टॉक्स जोडले आहेत.