Rakesh Jhunjhunwala यांनी ३ वर्षांत पहिल्यांदा Titan मध्ये वाढवला आपला हिस्सा; ६० टक्क्यांपर्यंत वाढलाय Share By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 01:41 PM 2021-10-23T13:41:25+5:30 2021-10-23T14:02:56+5:30
Rakesh Jhunjhunwala news: राकेश झुनझुनवाला आणि त्यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला (Rekha Jhunjhunwala) यांची टायटन (Titan) कंपनीत ४.८७ टक्क्यांचा हिस्सा आहे. बिग बुल (Big Bull) या नावाने प्रसिद्ध असलेले शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) आणि त्यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला (Rekha Jhunjhunwala) यांनी सप्टेंबर तिमाहीत टायटन कंपनीत (Titan Company) आपला हिस्सा वाढवला आहे.
२०१९ नंतर झुनझुनवाला दाम्पत्यानं पहिल्यांदा या शेअर्समध्ये (Stocks) आपला हिस्सा वाझवला आहे. या शेअर मध्ये वर्षभरात ६० टक्क्यांची वाढ झाली आहे.
३० सप्टेंबरपर्यंतच्या आकडेवारीनुसार झुनझुनवाला दाम्पत्याचा टायटन कंपनीमध्ये ४.८७ टक्के हिस्सा आहे. मागील तिमाहीत त्यांचा कंपनीतील हिस्सा ४.८१ टक्के इतका होता.
सप्टेंबर तिमाहीत, रेखा झुनझुनवाला यांनी टाटा समूहाच्या कंपनीतील त्यांची भागीदारी १.०९ टक्क्यांवरून १.०७ टक्क्यांवर आणली, तर राकेश झुनझुनवाला यांनी ती ३.७२ टक्क्यांवरून ३.८ टक्क्यांपर्यंत वाढवली. २०१९ च्या डिसेंबर तिमाहीनंतर झुनझुनवाला दाम्पत्याची कंपनीतील हिस्सा वाढला आहे. तेव्हा त्यांचा एकूण हिस्सा ६.७ टक्के होता.
गुरूवारी टायटनच्या शेअर्समध्ये थोडी घसरण झाली होती. त्यानंतर शुक्रवारी कामाकाजदरम्यान टायटनच्या शेअर्समध्ये वाढ दिसून आली. शुक्रवारी कंपनीचा शेअर वधारून २४१५ रूपयांवर पोहोचला.
सध्या कंपनीचं मार्केट कॅप २,१३,४२३.७९ कोटी रूपये आहे. यामध्ये झुनझुनवाला दांपत्याकडे असलेल्या हिस्स्याची किंमत १०,३९३ कोटी रूपये आहे. कंपनीनं यावर्षी गुंतवणूकदारांना ६० टक्क्यांपर्यंत रिटर्न दिले आहेत.
टाटा समुहाच्या आणखी एका कंपनी म्हणजेच टाटा मोटर्समध्ये झुनझुनवाला यांचा १.१४ टक्के हिस्सा आहे. यावर्षी त्या शेअर्समध्ये १५५ टक्क्यांची वाढ झाली आहे.
नव्या शेअर होल्डिंग डेटानुसार झुनझुनवाला दाम्पत्यानं सरकारी स्टील कंपनी सेल (SAIL) मध्येही आपला हिस्सा वाढवला होता. त्यांनी जून तिमाहीमध्ये सेलच्या शेअर्सना आपल्या पोर्टफोलिओमध्ये सामील केलं होतं.
या कंपनीत जून तिमाहित त्यांचा हिस्सा १.३९ टक्के होता. तो आता वाढून १.७६ टक्के झाला आहे. कंपनीमघ्ये झुनझुनवाला यांच्या हिस्स्याची व्हॅल्यू ३०० कोटींपेक्षा अधिक आहे.