Rakesh Jhunjhunwala मालामाल! TATA च्या ‘या’ स्टॉकने दिला ३ महिन्यांत १५४० कोटींचा लाभ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2022 02:14 PM2022-01-02T14:14:34+5:302022-01-02T14:25:40+5:30

राकेश झुनझुनवाला यांच्या नेटवर्थमध्ये आवडत्या स्टॉकमुळे कोट्यवधींची भर पडली असून, तुमच्याकडे आहेत का TATA च्या या कंपनीचे शेअर्स?

सन २०२१ हे वर्ष शेअर मार्केट आणि गुंतवणूकदारांसाठी जबरदस्त ठरले. कोरोना संकटातही अनेक कंपन्यांनी गुंतवणूकदारांना भन्नाट रिटर्न्स देऊन मालामाल केले. याशिवाय अनेकविध IPO मुळे गुंतवणूकदारांना नवीन पर्यायही उपलब्ध झाले.

शेअर मार्केटसाठी २०२२ हे वर्ष कसे ठरेल, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागून राहिलेली आहे. यातच आता शेअर मार्केटमध्ये बिग बूल नावाने ओळखल्या जाणाऱ्या Rakesh Jhunjhunwala यांना सन २०२१ वर्षांत मोठा लाभ झाला आहे.

Rakesh Jhunjhunwala यांना TATA च्या एका मोठ्या कंपनीच्या शेअरमुळे केवळ ३ महिन्यात तब्बल १५४० कोटींचा फायदा झाला आहे. TATA च्या कंपनीने गेल्या काही महिन्यात कमाल कामगिरी करत गुंतवणूकदारांना भन्नाट रिटर्न्स दिले आहेत.

Rakesh Jhunjhunwala यांच्या पोर्टफोलियोमध्ये समावेश असलेल्या TATA ग्रुपच्या Titan या कंपनीच्या शेअरने राकेश झुनझुनवाला यांना मालामाल केले आहे. टायटन कंपनीचा शेअर गेल्या तीन महिन्यात सुमारे ४०० रुपयांनी वधरला आहे. यामुळे गुंतवणूकादारांना चांगले रिटर्न्स मिळाले आहेत.

सप्टेंबर महिन्यात NSE वर TATA ग्रुपच्या Titan कंपनीचा शेअर २१६१.८५ रुपयांवर होता. मात्र, डिसेंबर महिन्याच्या अखेरीस याच शेअरची किंमत तब्बल २५१७.५५ रुपये झाली आहे. यामुळे Rakesh Jhunjhunwala यांच्या नेटवर्थमध्ये तब्बल १५४० कोटी रुपयांची भर पडल्याचे सांगितले जात आहे.

Rakesh Jhunjhunwala यांचा टायटन कंपनीचा स्टॉक अत्यंत आवडता असून, मध्यंतरी या कंपनीच्या शेअर्समधील गुंतवणूक राकेश झुनझुनवाला यांनी वाढवली होती. केवळ राकेश झुनझुनवाला नाही, तर त्यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांचीही या स्टॉकमध्ये मोठी गुंतवणूक असल्याचे सांगितले जात आहे.

Rakesh Jhunjhunwala यांचा टायटन कंपनाचा आवडता स्टॉक आगामी १५ ते २० दिवसांत २७०० रुपयांचा टप्पा सहज ओलांडेल, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे. त्यामुळे गुंतवणूकदार टायटन कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करू शकतात, असा सल्लाही यावेळी देण्यात आला आहे.

दुसरीकडे Rakesh Jhunjhunwala यांनी शेअर मार्केटमध्ये २४ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिकची गुंतवणूक केल्याचे सांगितले जात आहे. राकेश झुनझुनवाला यांनी डिसेंबरच्या तिमाहीत टाटा समूहाच्या कंपनीत गुंतवणूक वाढवली असून, राकेश झुनझुनवाला यांची टाटा समूहाच्या तीन कंपन्यांमध्ये गुंतवणूक आहे.

Rakesh Jhunjhunwala यांच्या यासाठी टायटनचा हा शेअर्स चांगले रिटर्न देणारा ठरला आहे. राकेश झुनझुनवाला आणि त्यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी मिळून कंपनीत आपला हिस्सा वाढवला आहे. सध्या दोघांकडेही मिळून कंपनीचा ४.८७ टक्के हिस्सा आहे.

आताच्या घडीला Rakesh Jhunjhunwala यांच्याकडे Tata Motors कंपनीचे ३,७७,५०,००० शेअर्स, Titan Stocks कंपनीचे ९६,४०,५७५ लाख शेअर्स असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, शेअर मार्केटमध्ये सर्वाधिक सूचीबद्ध कंपन्या TATA ग्रुपच्या आहेत. आतापर्यंत अनेकविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या TATA ग्रुपच्या एकूण २९ कंपन्या शेअर मार्केटमध्ये सूचीबद्ध झालेल्या आहेत. मार्केट कॅपमध्ये क्रमांक एक वर असलेल्या TATA ग्रुपचा मार्केट कॅप २१.९९ लाख कोटींवर गेला आहे.

TATA ग्रुपमध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) या कंपनीचा शेअर सर्वाधिक असून, यानंतर टायटन कंपनीचा मार्केट कॅप दुसऱ्या क्रमांकावर आहे. Titan चा मार्केट कॅप २.२९ लाख कोटी आहे. शेअर मार्केटमधील सूचीबद्ध ग्रुपचे एकूण मार्केट कॅप २७४ लाख कोटींवर आहे.